
donald trump greenland control golden dome missile defense system 175-billion dollars2026
Trump Golden Dome missile defense system 2026 : जागतिक राजकारणात सध्या एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ग्रीनलँड हे बेट ताब्यात घेण्यामागचे खरे कारण उघड केले आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेला रशिया आणि चीनच्या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांपासून वाचवण्यासाठी १७५ अब्ज डॉलर्सची ‘गोल्डन डोम’ (Golden Dome) ही क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा उभारली जात आहे. या यंत्रणेचे सर्वात महत्त्वाचे केंद्र ग्रीनलँडवर (Greenland) असणार आहे. “ग्रीनलँडशिवाय अमेरिकेचे रक्षण करणे अशक्य आहे,” असे विधान ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केले आहे.
इस्रायलच्या प्रसिद्ध ‘आयर्न डोम’ (Iron Dome) प्रणालीच्या धर्तीवर अमेरिका आता ‘गोल्डन डोम’ विकसित करत आहे. ही यंत्रणा केवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेच नाही, तर आधुनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि अंतराळातून होणारे हल्ले देखील रोखण्यास सक्षम असेल. ग्रीनलँड हा रशिया आणि अमेरिका यांच्या बरोबर मधोमध स्थित आहे. जर रशियाने अमेरिकेवर हल्ला केला, तर ती क्षेपणास्त्रे ग्रीनलँडच्या आकाशातून प्रवास करतील. म्हणूनच, ही क्षेपणास्त्रे अमेरिकेत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करण्यासाठी ग्रीनलँडवर इंटरसेप्टर्स तैनात करणे हे ट्रम्प यांच्या रणनीतीचा भाग आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Crisis 2026: इराणमध्ये युद्धाचा भडका! रक्ताळलेल्या इराणचा भारताला मदतीसाठी फोन; एस. जयशंकर यांची अरघचींशी महत्त्वाची चर्चा
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला आहे की, ग्रीनलँडच्या समुद्रात रशियन आणि चिनी जहाजांनी वेढा घातला आहे. “जर आपण ग्रीनलँड घेतले नाही, तर लवकरच तिथे चीनचे ध्वज दिसतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, नॉर्डिक देशांतील राजदूतांनी आणि संरक्षण तज्ज्ञांनी ट्रम्प यांचे हे दावे फेटाळले आहेत. त्यांच्या मते, ग्रीनलँडजवळ रशियन हालचालींचा कोणताही ठोस पुरावा नाही. असे असूनही, ट्रम्प हे ग्रीनलँडवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याच्या विचारात आहेत.
U.S. President Donald Trump unveils a $175 billion Golden Dome missile defense shield plan. pic.twitter.com/zZdZ9NBO1v — Globe Eye News (@GlobeEyeNews) May 21, 2025
credit – social media and Twitter
संरक्षणापलीकडे ग्रीनलँड हे बेट नैसर्गिक संसाधनांचे भांडार आहे. येथे युरेनियम, लिथियम, कोबाल्ट आणि स्मार्टफोन तसेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी लागणारे ‘रेअर अर्थ एलिमेंट्स’ (Rare Earth Elements) मुबलक प्रमाणात आहेत. सध्या या खनिजांवर चीनचे एकाधिकार (Monopoly) आहे. अमेरिकेला ही साखळी तोडून ग्रीनलँडमधून स्वतःचा पुरवठा सुरू करायचा आहे. ट्रम्प यांच्या मते, ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवणे म्हणजे चीनचे आर्थिक कंबरडे मोडण्यासारखे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO: ‘हिंदूंची गळे कापूनच काश्मीर मिळेल…’ लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा भारताविरुद्ध कट्टरतावादी विषारी प्रचार
ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग असल्याने डेन्मार्कने ट्रम्प यांची ऑफर धुडकावून लावली आहे. “ग्रीनलँड विक्रीसाठी नाही,” असे डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ट्रम्प यांनी नाटोला (NATO) स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, जर नाटोने अमेरिकेला ग्रीनलँड मिळवून देण्यासाठी मदत केली नाही, तर या युतीचा प्रभाव कमी होईल. ट्रम्प यांचा हा हट्ट जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती युरोपीय देशांना वाटत आहे.
Ans: ही १७५ अब्ज डॉलर्सची अद्ययावत संरक्षण प्रणाली असून ती अमेरिकेला बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी तयार केली जात आहे.
Ans: रशिया आणि अमेरिकेच्या मध्ये ग्रीनलँड असल्याने, रशियन क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यासाठी तेथे लष्करी तळ उभारणे अमेरिकेला सोयीचे पडणार आहे.
Ans: ग्रीनलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर मौल्यवान खनिजे आहेत, ज्यावर ताबा मिळवण्यासाठी किंवा अमेरिकेला रोखण्यासाठी चीन तिथे गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे.