Trump vs NATO: आता जर्मनी आणि ब्रिटन मैदानात, ट्रम्प ग्रीनलँडवरच अडून; युरोपमध्ये युद्धाची ठिणगी पेटली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump NATO statement January 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. त्यांनी केवळ नाटोच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर “नाटो (NATO) आज जिवंत आहे कारण मी तो वाचवला आहे,” असे मोठे विधान केले आहे. दुसरीकडे, ग्रीनलँड या डेन्मार्कच्या स्वायत्त प्रदेशावर ताबा मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या हट्टामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांमधील संबंध ऐतिहासिक नीचांकावर पोहोचले आहेत.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या आगमनापूर्वी नाटो सदस्य देश केवळ २% संरक्षण खर्च करत होते आणि अमेरिकेच्या पैशांवर अवलंबून होते. ट्रम्प यांच्या दबावामुळे हा खर्च आता ५.५% पर्यंत पोहोचला आहे. ट्रम्प यांच्या मते, नाटो सदस्य देश त्यांचे ‘बिल्स’ भरत नव्हते आणि जर त्यांनी अमेरिकेला बाहेर पडण्याची धमकी दिली नसती, तर ही संघटना आज इतिहास जमा झाली असती. ट्रम्प यांनी पुढे असाही दावा केला की, रशिया आणि चीन फक्त अमेरिकेला घाबरतात, नाटोला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: पुन्हा सुरु होणार भारत-पाक युद्ध? पाकड्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आकाशमार्गे ड्रोनसोबत पाठवला ‘मृत्यू संदेश’; पहा VIDEO
ट्रम्प यांनी ग्रीनलँडला केवळ जमीन म्हणून नव्हे, तर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक अनिवार्य गरज म्हणून संबोधले आहे. “जर आम्ही ग्रीनलँड घेतले नाही, तर तिथे रशिया आणि चीनचे तळ उभे राहतील. मी हे कधीही होऊ देणार नाही,” असे ट्रम्प यांनी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट यांनी तर असेही स्पष्ट केले की, ग्रीनलँड मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करणे हा पर्यायही अमेरिकेसाठी खुला आहे.
🇬🇧🇩🇪🇫🇷 UK, FRANCE, GERMANY EYE TROOPS TO GREENLAND. TRUMP BLOCKER? British officials huddled with Germany and France brass to sketch NATO boots, ships, planes on Greenland from Ämari-style bases, all to lock down Arctic vs Russia/China creeps. Early days, but Starmer’s all-in… pic.twitter.com/zxQZ9UYzfS — Mario Nawfal (@MarioNawfal) January 11, 2026
credit : social media and Twitter
ट्रम्प यांच्या या उघड धमकीनंतर युरोपीय देशांनी एकजूट दाखवली आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ग्रीनलँडच्या सुरक्षेसाठी संयुक्त लष्करी मोहीम राबवण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. ‘आर्क्टिक सेंट्री’ (Arctic Sentry) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेद्वारे युरोपीय देशांचे सैनिक, युद्धनौका आणि विमाने ग्रीनलँडमध्ये तैनात केली जातील. याद्वारे युरोप अमेरिकेला हा संदेश देऊ इच्छितो की, ग्रीनलँडवर कोणताही हल्ला झाल्यास तो संपूर्ण नाटोवर झालेला हल्ला मानला जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : जगाचा नकाशा बदलणार? NATOने केले बंड; Greenlandसाठी जर्मनी मिलिटरी युद्धसज्ज, ट्रम्प मात्र अस्वस्थ
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांना ‘विचित्र’ आणि ‘अस्वीकार्य’ म्हटले आहे. “एका नाटो मित्रदेशाने दुसऱ्या नाटो देशावर हल्ला करणे म्हणजे द्वितीय विश्वयुद्धानंतरच्या सुरक्षा व्यवस्थेचा अंत असेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या “ग्रीनलँड चीन आणि रशियन जहाजांनी भरले आहे” या दाव्यालाही डेन्मार्कने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. यामुळे आता नाटो संघटना खरोखरच फुटणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या दबावामुळेच सदस्य देशांनी आपला संरक्षण खर्च ५.५% पर्यंत वाढवला असून, जर ते अध्यक्ष नसते तर नाटो संघटना आतापर्यंत विसर्जित झाली असती.
Ans: हे देश 'आर्क्टिक सेंट्री' या मोहिमेअंतर्गत ग्रीनलँडमध्ये आपले सैन्य आणि युद्धनौका तैनात करण्याची योजना आखत आहेत, जेणेकरून अमेरिकेच्या संभाव्य आक्रमणापासून ग्रीनलँडचे संरक्षण करता येईल.
Ans: ग्रीनलँड हे धोरणात्मकदृष्ट्या रशिया आणि अमेरिकेच्या मध्ये आहे. तसेच तिथे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक खनिजे असून आर्क्टिक प्रदेशावर वर्चस्व राखण्यासाठी ते महत्त्वाचे आहे.






