Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Penguin: अत्यंत हास्यास्पद! ‘आणि यांना ग्रीनलँड हवाय…’, व्हाईट हाऊसची ‘ती’ पोस्ट ठरली 2026 मधील सर्वात मोठे ट्रोलिंग

Greenland Penguin Photo : व्हाईट हाऊसने शेअर केलेला डोनाल्ड ट्रम्पचा ग्रीनलँडमध्ये पेंग्विनसोबतचा एक एआय फोटो सोशल मीडियावर हास्याचा विषय बनला आहे. पोस्टला 'पेंग्विनला आलिंगन द्या' असे कॅप्शन देण्यात आले होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 24, 2026 | 04:30 PM
donald trump greenland penguin ai photo meme trolled white house geography error 2026

donald trump greenland penguin ai photo meme trolled white house geography error 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • भौगोलिक घोडचूक
  • आर्क्टिक स्वप्नाचा पाठपुरावा
  • ‘निहिलिस्ट पेंग्विन’ ट्रेंड

Donald Trump Greenland penguin AI photo meme : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे आपल्या अतरंगी स्वभावासाठी आणि वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखले जातात. मात्र, यावेळी व्हाईट हाऊसने शेअर केलेल्या एका फोटोने त्यांच्यावरच नामुष्की ओढवली आहे. ग्रीनलँड (Greenland) ताब्यात घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ट्रम्प यांनी एका एआय-जनरेटेड (AI) फोटोत चक्क पेंग्विनसोबत फेरफटका मारला. पण, ट्रम्प यांच्या टीमला हे माहित नव्हते की, निसर्गात पेंग्विन हे ग्रीनलँडमध्ये (उत्तर गोलार्ध) नसून दक्षिण गोलार्धात (अंटार्क्टिका) आढळतात. या एका चुकीमुळे ट्रम्प यांना जागतिक स्तरावर ‘भूगोलाचा धडा’ दिला जात आहे.

काय आहे तो फोटो आणि पेंग्विनचा पेच?

व्हाईट हाऊसच्या अधिकृत हँडलवरून शनिवारी एक फोटो पोस्ट करण्यात आला. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प एका पेंग्विनसोबत बर्फाळ प्रदेशात चालताना दिसत आहेत. या फोटोला “पेंग्विनला आलिंगन द्या” (Embrace the Penguin) असे कॅप्शन देण्यात आले होते. यामागे ट्रम्प यांचा हेतू ग्रीनलँडमधील अमेरिकेची उपस्थिती ‘फ्रेंडली’ दाखवण्याचा होता. परंतु, शास्त्रज्ञ आणि नेटिझन्सनी काही मिनिटांतच ही चूक पकडली. पेंग्विन हे नैसर्गिकरित्या केवळ दक्षिण गोलार्धात राहतात. ग्रीनलँड हे उत्तर ध्रुवाच्या जवळ आहे, जिथे केवळ ध्रुवीय अस्वल (Polar Bears) आढळतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Immigration: इमिग्रेशन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; अमेरिकन कोर्टाचे भारतीय स्थलांतरितांच्या बाजूने 3 ऐतिहासिक निकाल

‘निहिलिस्ट पेंग्विन’ आणि ट्रम्प यांचा ‘मास्टरस्ट्रोक’

सध्या सोशल मीडियावर ‘निहिलिस्ट पेंग्विन’ (Nihilist Penguin) नावाचा एक मीम ट्रेंड जोरात सुरू आहे. हा ट्रेंड २००७ च्या ‘एनकाउंटर्स अॅट द एंड ऑफ द वर्ल्ड’ या माहितीपटातील एका दृश्यावरून आला आहे, ज्यात एक पेंग्विन आपल्या वसाहतीपासून दूर पर्वतांकडे एकटाच निघून जातो. या ट्रेंडचा फायदा घेऊन ट्रम्प यांनी ग्रीनलँडमधील आपली रणनीती मांडण्याचा प्रयत्न केला. पण, पेंग्विनच्या पावलांचे ठसे चक्क मानवी पायांसारखे दिसत असल्यामुळे हा फोटो एआयने बनवलेला एक निकृष्ट दर्जाचा प्रयत्न असल्याचे समोर आले.

🐧 “Embrace the penguin” That’s the caption the White House posted on X, showing Trump with a penguin in snowy Greenland. Apparently, nobody mentioned that penguins don’t live in Greenland. pic.twitter.com/CkCsSQMezZ — Defense News (@defensesignal) January 24, 2026

credit – social media and Twitter

ग्रीनलँड: ट्रम्प यांचे जुने आणि आक्रमक स्वप्न

ट्रम्प यांची ग्रीनलँडमधील आवड केवळ पेंग्विनपुरती मर्यादित नाही. जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी दावोस (Davos) येथील जागतिक आर्थिक परिषदेत ग्रीनलँड हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अनिवार्य असल्याचे म्हटले होते. या प्रदेशातील खनिज संपत्ती आणि रशिया-चीनला रोखण्यासाठी असलेल्या लष्करी महत्त्वामुळे ट्रम्प यांनी यापूर्वी डेन्मार्कवर दबाव टाकला होता. अगदी “कठीण मार्गाने” (लष्करी बळ वापरून) ग्रीनलँड मिळवण्याची धमकीही त्यांनी दिली होती. मात्र, या मीममुळे त्यांच्या गंभीर रणनीतीचे आता हास्यात रूपांतर झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-UAE Friendship: मोदी-नाह्यान मैत्रीचा ‘ग्रँड’ निकाल! 900 भारतीय कैद्यांची सुटकेचा मेगा प्लॅन; स्वतः UAE सरकारने भरला दंड

युरोप आणि डेन्मार्कचा सणसणीत टोला

डेन्मार्कचे खासदार रॅस्मस जारलोव्ह यांनी ट्रम्प यांना टोला लगावताना लिहिले की, “व्हाईट हाऊसचा संदेश स्पष्ट आहे: ट्रम्प यांचे ग्रीनलँडशी तितकेच नाते आहे, जितके पेंग्विनचे!” म्हणजेच, पेंग्विन जसे ग्रीनलँडचे नाहीत, तसेच ट्रम्प यांचाही ग्रीनलँडवर कोणताही अधिकार नाही. हा वाद आता केवळ भौगोलिक चुकीचा राहिला नसून, ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणांवरील टीकेचा एक मोठा भाग बनला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पेंग्विन ग्रीनलँडमध्ये आढळतात का?

    Ans: नाही. पेंग्विन हे नैसर्गिकरित्या केवळ दक्षिण गोलार्धात (विशेषतः अंटार्क्टिका) आढळतात. ग्रीनलँड उत्तर गोलार्धात असल्याने तिथे पेंग्विन नसतात.

  • Que: व्हाईट हाऊसने तो फोटो का शेअर केला?

    Ans: सध्या व्हायरल होत असलेल्या 'निहिलिस्ट पेंग्विन' मीम ट्रेंडमध्ये सामील होण्यासाठी आणि ग्रीनलँडमधील अमेरिकेची आवड दर्शवण्यासाठी व्हाईट हाऊसने हा AI फोटो शेअर केला.

  • Que: ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे?

    Ans: राष्ट्रीय सुरक्षा, रशिया-चीनच्या लष्करी हालचालींवर नियंत्रण आणि ग्रीनलँडमधील दुर्मिळ खनिजांच्या साठ्यासाठी ट्रम्प यांना ग्रीनलँड अमेरिकेत विलीन करायचे आहे.

Web Title: Donald trump greenland penguin ai photo meme trolled white house geography error 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • US White House

संबंधित बातम्या

US Immigration: इमिग्रेशन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; अमेरिकन कोर्टाचे भारतीय स्थलांतरितांच्या बाजूने 3 ऐतिहासिक निकाल
1

US Immigration: इमिग्रेशन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; अमेरिकन कोर्टाचे भारतीय स्थलांतरितांच्या बाजूने 3 ऐतिहासिक निकाल

Middle East War Alert : इराणमध्ये युद्धाचा बिगुल वाजला? 6 मोठ्या विमान कंपन्यांनी अचानक फ्लाइट्स केल्या रद्द, नेमकं काय सुरुय?
2

Middle East War Alert : इराणमध्ये युद्धाचा बिगुल वाजला? 6 मोठ्या विमान कंपन्यांनी अचानक फ्लाइट्स केल्या रद्द, नेमकं काय सुरुय?

Bangladesh Election 2026: भारताच्या सीमेवर कट्टरवाद्यांचे सावट; अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे ‘जमात’ची हिंमत वाढली
3

Bangladesh Election 2026: भारताच्या सीमेवर कट्टरवाद्यांचे सावट; अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे ‘जमात’ची हिंमत वाढली

US Winter Storm 2026: अमेरिकेत ‘हिम त्सुनामी’! -48 अंश तापमानाने 18 कोटी लोक घरांत कैद; 8000 विमानं रद्द, ट्रम्प यांचा अजब सवाल
4

US Winter Storm 2026: अमेरिकेत ‘हिम त्सुनामी’! -48 अंश तापमानाने 18 कोटी लोक घरांत कैद; 8000 विमानं रद्द, ट्रम्प यांचा अजब सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.