Donald Trump tarrif
Donald Trump Tariff : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टॅरिफ संदर्भात आणखी एक आदेश जारी केला आहे. १ नोव्हेंबरपासून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या मध्यम आणि जड ट्रक आणि त्यांच्या सुट्या भागांवर २५% कर लागू करण्याचा आदेश दिला आहे. तसेच बसेसवरही १०% शुल्क (Tarrif) लागू केले जाणार आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. त्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे. पण ट्रम्प यांच्या मते, त्यांनी हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर घेतला आहे. याचा उद्दिष्ट अमेरिकेत ऑटोमोबाईल उत्पादनादात वाढ करणे आहे. परंतु याचा सर्वात मोठा फटका मेक्सिकोला बसण्याची शक्यता आहे. कारण मेक्सिको हा अमेरिकेला मध्यम व जड ट्रक मोठ्या प्रमाणात निर्यात करतो.
Mozambique : आफ्रिकन देश मोझांबिकमध्ये मोठी दुर्घटना; बोट उलटल्याने ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता
ट्रम्प यांच्या आदेशानानुसार, त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन वाहन उत्पादकांना २०३० पर्यंत त्यांच्या अमेरिकेत असेंबल केलेल्या वाहनांच्या रिटेल किमतींच्या ३.७५% क्रेडिट मिळेल. यामुळे आयात केलेल्या ट्रकच्या पार्टसवरचा टॅरिफ खर्च कमी होईल. तसेच अमेरिकेत इंजिन उत्पादन वाढवणे आणि ट्रकांच्या उत्पादनासाठी देखील क्रेडिट वाढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ट्रम्प यांच्या आदेशानुसार, १ नोव्हेंबरपासून क्लास ३ ते क्लास ८ पर्यंतच्या सर्व प्रकारच्या ट्रकांवर टॅरिफ लागू होईल. यामध्ये मोठे पिक-अप ट्रक, मूविंग ट्रक, डंप ट्रक, १८ ट्र्रॅक्टर यांचा समावेश आहे. हा निर्णय अमेरिकन उत्पादकांना परकीय आणि अन्यायी स्पर्धांपासून वाचवण्यासाठी आहे.
परंतु ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा ऑटोमोटिव्ह ट्रक उद्योगांना म्हणजेच ट्रक आणि त्यांचे पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्यांना बसण्याची शक्यात आहे. यामुळे या कंपन्यांचा खर्च वाढेल. विशेष करुन परकीय उत्पादनांवर अवलंबून असलेल्या कंपन्यांवर परिणाम होईल.
यामुळे ट्रक पार्ट्स पुरवठादार, कच्चा माल व्यापारी, स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या लहान उद्योगांना याचा फटका बसण्याची शक्यत आहे. शिवाय बसव लागू केलेल्या १० टक्के शुल्कामुळेही कंपन्यांना फटका बसणार आहे.
या शिवाय मेक्सिको देशालाही याचा सर्वाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मेक्सिको हा अमेरिकेला जड ट्रकांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा स्रोत आहे.
प्रश्न १ डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कशावर कर लागू केला आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या मध्यम व जड ट्रक आणि त्यांच्या सुट्या पार्ट्सवर, बसेसवर कर लागू केला आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांनी ट्रक व बसेसवर किती कर लागू केला आहे?
ट्रम्प यांनी मध्यम व जड ट्रक आणि त्यांच्या सुट्या पार्ट्सवर २५% कर लागू केला आहे, तर बसेसवर १०% कर लागू केला आहे.
प्रश्न ३ ट्रम्प यांच्या निर्णयाचा कोणत्या देशाला फटका बसणार आणि का?
ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफचा फटका मेक्सिकोला बसण्याची शक्यता आहे, कारण मेक्सिको हा अमेरिकेला जड ट्रक पुरवणारा सर्वात मोठा स्रोत आहे.
Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला ‘एअर स्ट्राईक’; 3 क्रिकेटपट्टूंसह दहा जणांचा मृत्यू