आफ्रिकन देश मोझांबिकमध्ये मोठी दुर्घटना; बोट उलटल्याने ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Boat Capsized in Mozambique : नवी दिल्ली : आग्नेय आफ्रिकन देश मोझांबिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोझांबिकमधील बेइरा बंदराजवळ शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) १४ भारतीयांना घेऊन निघालेली बोट उलटली (Boat accident). यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एक टँकर किनाऱ्यावरुन जहाजावर क्रू मेंबर्सनाला घेऊन निघाला होता. यावेळी ही भीषण दुर्घटना घडली.
Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला ‘एअर स्ट्राईक’; 3 क्रिकेटपट्टूंसह दहा जणांचा मृत्यू
भारतीय दूतावासाने या संदर्भात एक निवेदन जारी करत या घटनेची माहिती दिली. दूतावासेन या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. दूतावासाने दिलेल्या वृत्तानुसार, जहाजावर एकूण १४ भारतीय होते. यातील काही भारतीयांना वाचवण्यात यश आले आहे. पण अजूनही काहीजण बेपत्ता आहेत. अपघाताचे कारण सध्या अस्पष्ट आहे.
दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, हस्तांतरण ऑपरेशनसाठी या भारतीय क्रू मेंबर्सला नेले जात होते, पण दुर्दैवाने या बोटीचा अपघात झाला आणि काही भारतीयांचा यात मृत्यू झाला. दूतावासाने मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच पीडीतांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचेही भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. यातील एक व्यक्ती गंभीर जखणी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता भारतीयांचा शोध घेणे सुरु आहे. पण अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. भारतीय दूतावास देखील या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
प्रश्न १. कोणत्या आफ्रिकन देशात घडला बोट अपघात?
आग्नेय आफ्रिकन देश मोझांबिकमध्ये बोट अपघात घडला आहे.
प्रश्न २. मोझांबिकमध्ये कुठे आणि कसा घडला अपघात?
मोझांबिकमधील बेइरा बंदराजवळ शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) भारतीय क्रू मेंबर्सला घेऊन निघालेली बोट उलटल्याने अपघात घडाला आहे.
प्रश्न ३. मोझांबिकमधील बोट अपघातात किती भारतीयांचा मृत्यू झाला?
मोझांबिकमधील बोट अपघातात तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
प्रश्न ४. बोट अपघातात किती लोक बेपत्ता झाले आहे?
मोझांबिकमधील बोट अपघातात पाच भारतीय बेपत्ता झाले आहेत.
प्रश्न ४. मोझांबिकमधील बोट अपघातावर भारतीय दूतावासाने काय म्हटले?
मोझांबिकमधील बोट अपघातावर भारतीय दूतावासेन शोक व्यक्त केला आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे म्हटले आहे. तसेच बेपत्ता भारतीयांच्या शोध मोहिमेचाही आढावा घेतला जात असल्याचे दूतावासाने म्हटले.