Donald Trump Middle East trip US signs $1.2 trillion deal with Qatar
दोहा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला भेट दिली असून बुधवारी ते कतारला रवाना झाले होते. दरम्यान ट्रम्प कतारला पोहोचले असून कतारची राजधानी दोहामध्ये त्यांनी काल रात्री बुधवारी (१४ मे) कतारचे अमीर शेख तमीन बिन हमद अल-थानी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कतार आणि अमेरिकत १.२ ट्रिलियन म्हणजे १०० लाख कोटी रुपयांचा स्वतंत्र्य करार केला.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये २४३ अब्ज डॉलर्सचा आर्थिक करार देखील करण्यात आला आहे. या आर्थिक करारात कतार एअरवेजकडून अमेरिकेची बोईंग विमानांची खरेदी, शस्त्रे , नैसर्गिक वायू आणि क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवहार करण्यात आले.
कतार एअरवेजने बोईंग आणि जीई एरोस्पस या अमेरिकन कंपन्यांसोबत २१० मेड मेड इन अमेरिका बोईंग ७८७ डीमलायनर आणि ७७७एक्स विमाने खरेदी केली. या विमानांची किंमात ९६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ८ कोटी रुपये आहे.
अमेरिका आणि कतारमध्ये चार प्रमुख महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत.
याच वेळी भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील कतारमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोघांनी हस्तांदोलन केले. काही वेळ मुकेश अंबानी आणि ट्रम्प यांनी चर्चा केली
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या विदेश दौऱ्यावर आहे. त्यांनी सौदी अरेबिया आणि कतारला भेट दिली आहे. दोन्ही देशांसोबत कोट्यावंधींचा शस्त्र करार करण्यात आला आहे. तसेच आजा ट्रम्प यूएईला रवाना होणार आहे. यूएईमध्ये ट्रम्प अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेल अल नाह्यान यांची भेट घेतील. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), सेमीकंडक्टर आणि उर्जेशी संबंधित मुद्द्यांवर यूएई अमेरिकेत चर्चा होईल.
ट्रम्प यांचा आखाती देशांचा दौऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. परंतु या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी सीरियावरील सर्व निर्बंध हटवले आहेत. तसेच ट्रम्प यांनी सीरियाचे अंतरिम सरकारचे अध्यक्ष अल-जुलानी यांचीही भेट घेतली आहे. ट्रम्प यांच्या या भेटीने मोठी खळबळ उडाली आहे. कारण अल-जुलानी सीरियतील एचटीएस या विद्रोही गटांचे प्रमुख होते.