अमेरिका आणि सौदी अरेबियात मोठा संरक्षण करार; 142 अब्ज डॉलर्सची ही शस्त्रास्त्र खरेदी करणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पहिली भेट सौदी अरेबियाला दिली. दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची रियाधमध्ये भेट घेतली. या दौऱ्यात अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये मोठा करारा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदीसोबत अमेरिकेने १४२ अब्ज किमतीच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे.
सौदी अरेबियाची ही आतापर्यंतची सर्वात मोटी डील मानली जात आहे. व्हाईट हाऊसने या कराराला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा करारा म्हटले आहे. व्हाईट हाऊने दिलेल्या माहितीनुसार, या करारांतर्गत सौदी अरेबियाला C-130 वाहतूक विमाने, क्षेपणास्त्रे, रडार प्रणाली आणि अनेक अत्याझुनिक शस्त्रे अमेरिकेकडून दिली जाणार आहेत. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन, बोईंद आणि नॉथ्रॉप ग्रमुन यांसारख्या अमेरिकन कंपन्यांनकडून सौदी अरेबियाला शस्त्र पुरवठा केला जाणार आहे.
BREAKING: Trump is lifting sanctions on Syria—just after its new leader, Ahmed al-Sharaa, a former al-Qaeda fighter linked to the deaths and injuries of dozens of American troops, proposed building a Trump Tower in the country.
A known terrorist offers Trump a tower, and… pic.twitter.com/qua54oTslR
— Ed Krassenstein (@EdKrassen) May 13, 2025
ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हा त्यांच्या पहिला अधिकृत विदेश दौरा आहे. यामध्ये त्यांनी पहिली भेट सौदीला दिली असून यानंतर ते यूएई आणि कतारला भेट देणार आहेत.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या आखाती देशांच्या दौऱ्याला अधिक महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आखाती देशांमधून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक व्हावी या उद्देशाने ट्रम्प यांचा हा दौरा आहे. यामुळे अमेरिकेला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
सौदीकडून शस्त्रास्त्र कराराला मंजुरी मिळाल्यानंतर, यूएस डिफेन्स कोऑपरेशन एजन्सीने सांगितले की, शस्त्रास्त्रांची विक्री मित्र देशांच्या संरक्षणाला बळकट देणारी आहे. यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांना पाठिंबा मिळे. तसेच आखाती प्रदेशांमध्ये राजकीय स्थिरता आणि आर्थिक प्रगती होईल. अमेरिका आणि सौदी अरेबियातील हा सर्वात मोठा करार आहे.
सौदी अरेबियाने अमेरिकेत सुमारे 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक 1 ट्रिलियनपर्यंत वाढवण्याची इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका सौदी अरेबियाला काही काळात 3.3 अब्ज डॉलर्सच्या किमीतीची अत्यादुनिक लढाऊ विमाने पुरवणार आहे. सौदी अरेबियाला दिल्या जाणाऱ्या शस्त्रांमद्ये 1000 AIM-120C-8 या प्रगत प्रणालीची लढाऊ विमाने आहेत.