Donald Trump moves former president Barack Obama and George Bush portraits from White house
Donald Trump News marathi: वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत चर्चेत असतात. सध्या त्यांनी दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात अनेक निर्णयांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. त्यांच्या अनेक निर्णयांनी जगभर त्यांचे शत्रू निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी अगदी अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींशी देखील शत्रुत्व घेतले आहे. ट्रम्प यांनी माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे फोटो व्हाइटहाऊसमधून हटवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाने अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी बराक ओबामा (Barack Obama) आणि जॉज बुश यांचे फोटो कमी महत्वाच्या ठिकाणी लावण्याचे आदेश दिले आहे. पूर्वी या दोन्ही राष्ट्राध्यक्षांचे फोटो व्हाइट हाउसच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले होते. परंतु ट्रम्प यांनी हे फोटो हटवले आहे. या आदेशामुळे ट्रम्प यांचे बराक ओबामा आणि जॉर्ज बुश सोबकच संबंध बिघडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
WSAZ ने दिलेल्या वृत्तानुसार, ओबामांसोबत जॉर्ज बुश आणि जॉर्ज बुशचे वडिल जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे देखील फोटो काढून टाकण्यात आले आहेत. हे फोटो जिथे कोणाचीच नजर जाणार नाहीत अशा ठिकाणी लावण्यात आले आहेत.
भारतात ‘गुपचूप’ कार्यालय उघडत आहे शेख हसीनाचा पक्ष? गुपित उघडं पडलं, युनूसवर भडकले नेता
CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइट हाउसच्या हवाल्याने सांगितले की, ओबामा आणि बुश यांचे फोटो ग्रँड स्टेअरकेसच्या वरच्या बाजूला टांगण्यात आले आहे. व्हाइट हाउसच्या पहिल्या मजल्याला आणि दुसऱ्या बाजूला जोडणार जिन्यावर हे फोटो आहेत. हा भागा गुप्तहेर संस्था, एजंट आणि व्हाइट हाउस एक्झिक्युटिव्हच्या काही कर्मचाऱ्यांसाठी आहे.
CNN च्या मते, ओबामांचा फोटो लोकांच्या नजरेतून दूर करण्यात आला आहे. परंतु व्हाइट हाउसच्या प्रोटोकॉल आणि परंपरेनुसार राष्ट्रपतींचे फोटो सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ लावले जातात. परंतु ट्रम्प यांनी या पंरपरेचे उल्लंघन केले आहे. सध्या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर तीव्र टीका केली जात आहे. काहींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे, तर काही लोकांनी ट्रम्प इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
काय आहे वादाचे नेमकं कारण?
गेल्या काही काळात डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. २०१६ च्या निवडणुकीत ओबामा यांनी ट्रम्प प्रशासनावर देशद्रोहाचा आरोप केला होता. तसेच ट्रम्प यांना सत्तेतून हटवण्यासाठी देखील कट रचला होता. यामुळेच कदाचित ट्रम्प यांनी ओबामा यांचे फोटो व्हाइट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळून हटवले असतील.
दुसरीकडे जॉर्ज बुश यांच्यासोबतही ट्रम्प यांचा वाद राहिला आहे. जॉर्ज बुश यांनी एकदा डोनाल्ड ट्रम्पवर टीका देखील केली होती. तसेच त्यांना ट्रम्प यांनी अयशस्वी अध्यक्ष म्हणून संबोधले होते.
असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार