
donald trump nato greenland deal framework tariffs cancelled davos 2026
Donald Trump NATO Greenland deal Davos 2026 : जागतिक राजकारणात आपल्या अनपेक्षित निर्णयांनी खळबळ उडवून देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) बैठकीत ट्रम्प यांनी जाहीर केले की, त्यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपीय देशांवर लादलेले कठोर आर्थिक निर्बंध (Tariffs) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नाटो’ (NATO) या लष्करी संघटनेसोबत झालेल्या एका ‘फ्रेमवर्क’ करारामुळे हे शक्य झाले असून, यामुळे जागतिक बाजारपेठेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ट्रम्प यांनी नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर ‘ट्रुथ सोशल’वर या कराराची माहिती दिली. ट्रम्प म्हणाले, “आम्ही ग्रीनलँड आणि संपूर्ण आर्क्टिक क्षेत्राच्या सुरक्षेबाबत भविष्यातील कराराचा एक आराखडा तयार केला आहे. हा उपाय अमेरिका आणि सर्व नाटो देशांसाठी एक अद्भुत असेल.” या करारामुळे १ फेब्रुवारीपासून डेन्मार्क, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसह आठ युरोपीय देशांवर लागू होणारे १०% आयात शुल्क आता लादले जाणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ग्रीनलँड केवळ एक बर्फाळ बेट नसून, ते अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’ (Golden Dome) या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे केंद्र आहे. ट्रम्प यांच्या मते, रशिया आणि चीनच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण किंवा किमान लष्करी वर्चस्व असणे आवश्यक आहे. या नव्या करारानुसार, अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये अधिक लष्करी तळ उभारण्याची आणि अत्याधुनिक शस्त्रप्रणाली तैनात करण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे.
Traders gonna cash in big on Trump’s Davos words again. Trump hits NATO hard with tariff threats over Greenland snub and weak ally support. • Alliance squeeze · Trump gave Denmark a hard deadline for Greenland by Feb 1 2026 · Threatens 10% tariffs rising to 25% on Denmark… pic.twitter.com/H6l2P2P5oW — Gustaffson Kotte (@gustaffsonkotte) January 21, 2026
credit – social media and Twitter
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी ग्रीनलँड मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचे संकेत दिले होते, ज्यामुळे युरोपमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, दावोसमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही ग्रीनलँडसाठी बळाचा वापर करणार नाही, पण आम्हाला त्याचे हक्क आणि मालकी हक्क हवे आहेत.” त्यांनी युरोपीय मित्र राष्ट्रांना आठवण करून दिली की, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनेच युरोपला वाचवले होते, त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा गरजांसाठी ग्रीनलँडचा त्याग करणे हा एक ‘लहानसा’ मुद्दा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा
हा करार पूर्णत्वास नेण्यासाठी ट्रम्प यांनी त्यांच्या सर्वात विश्वासू टीमची नियुक्ती केली आहे. उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे थेट डेन्मार्क आणि नाटो प्रतिनिधींशी चर्चा करतील. हा करार केवळ अमेरिकेसाठी नाही, तर जागतिक शांततेसाठी महत्त्वाचा असल्याचे ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले.
Ans: नाटो (NATO) सोबत ग्रीनलँड आणि आर्क्टिक सुरक्षेबाबत एक 'फ्रेमवर्क करार' झाल्यामुळे ट्रम्प यांनी १ फेब्रुवारीपासून लागू होणारे टॅरिफ रद्द केले आहेत.
Ans: 'गोल्डन डोम' ही अमेरिकेची अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, जिचे महत्त्वाचे केंद्र ग्रीनलँडमध्ये उभारण्याचे ट्रम्प यांचे नियोजन आहे.
Ans: या करारामुळे डेन्मार्कवर लादले जाणारे १०% ते २५% आयात शुल्क टळले असून, आर्क्टिक क्षेत्रात नाटोच्या सहकार्याने सुरक्षा अधिक मजबूत होईल.