'नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत...!' ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान, माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या २०१५ च्या कार्यकाळात इराणसोबत केलेल्या अणु कारारावर भाष्य केले. ट्रम्प यांच्यामतेस, २०१८ मध्ये अमेरिका या करारातून बाहेर पडला होता. हा करार कायम राहिला असता तर आतापर्यंत इराणकडे सर्वात मोठा अण्वस्त्रांचा साठा असता. परिणामी इराणने या शस्त्रांच्या मदतीने इस्रायलचा नाश केला असता. तसेच मध्यपूर्वेतील स्थिरताही धोक्यात आली असती असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.
ट्रम्प यांच्या मते, २०१५ मध्ये झालेला करारानुसार, इराणने ३.६७% युरेनियम संवर्धन ठेवण्याचे मान्य केले होते. परंतु त्यांनी २०१८ मध्ये या करारातून माघार घेतली. यामुळे इराणने अण्वस्त्र निर्मितीच्या दिशेने पाउले उचलण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे इस्रायलचे अस्तित्व धोक्यात आले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात इराणविरोधातील कठोर भूमिकेमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेजांमिन नेतन्याहू (Benjamin Netanhyahu) आज जिवंत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले.
याच वेळी ट्रम्प यांनी संघर्षादरम्यान मध्यपूर्वेतील आखाती मित्र राष्ट्रांच्या समर्थनाचे आभार मानले. इस्रायल, कतार, कुवैत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती हे अमेरिकेचे चांगले सोबती असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी या देशांच्या संरक्षणासाठी अमेरिकाब वचबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.
शिवाय ट्रम्प यांनी आपल्या भाषणापूर्वी अत्यंत मिश्किल अशा अंदाजात स्वत:चे गुणगाण गायले होते. त्यांनी म्हटले की, मी किती महान आणि उत्तम नेता आहे हे लोकांना कळेल असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी त्यांच्या कठोर धोरणामुळेच इराणला अण्वस्त्रे बनवता येणार नाहीत हेही स्पष्ट केले.
Trump says Israel wouldn’t exist if he hadn’t scrapped Obama‑era Iran nuclear deal pic.twitter.com/9MzjLR8Z96 — HatsOff (@HatsOffff) April 2, 2026






