Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर

Strait Of Hormuz Cisis : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन-उर्जा संकट निर्माण झाले आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 03:21 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा इराण युद्धावर मोठा दावा
  • तेल खरेदीसाठी अमेरिका पर्यायी मार्ग?
  • जाणून घ्या १९ मिनिटांच्या भाषणात आणखी काय म्हणाले ट्रम्प ?
Donal Trump on Oil Crisis : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील संघर्षाचा आज ३४ वा दिवस आहे, मात्र थांबण्याचे काही नाव घेईना. या युद्धात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) बंद केला आहे. ज्यामुळे जगासमोर मोठे उर्जा आणि इंधन संकट ठोकले आहे. याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गुरुवारी (०२ एप्रिल २०२६) राष्ट्राला संबोधून भाषण केले. या भाषणात त्यांनी इराणविरुद्ध युद्धात अमेरिकेच्या विजयाची घोषणा केली. याच वेळी त्यांनी एक मोठा व्यापारी डावही साधला. ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझवर भाष्य करत जगासमोर तेल खरेदीसाठी तीन पर्याय ठेवले. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र

ट्रम्प यांचा त्रिसूत्री व्यापारी डाव

ट्रम्प यांनी होर्मुझ स्ट्रेटवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी होर्मुझमधून माघार घेतली आहे. तसेच आखाती देशांनी देखील नवे पर्याय शोधले आहे. मात्र काही देशांना या मार्गाशिवाय तेल आणि गॅसचा पुरवठा मिळणे कठणी आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी जगासमोर तीन पर्याय ठेवले आहेत.

  • अमेरिकेकडून थेट खरेदी – ट्रम्प यांनी जगाला इशारा दिला आहे की, अमेरिकेकड तेलाचा अफाट साठा आहे. यामुळे जगाने यामुळे आमच्याकडून तेल आणि गॅस खरेदी करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
  • याच वेळी ट्रम्प यांनी अमेरिकन नौदल कोणत्याही देशांच्या विनामूल्य टँकर्सना होर्मुझमधून मार्ग दाखवणार नाही असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
  • आणि जर कोणाला होर्मुझमधूनच व्यापार करायचा असेल, तर त्यांनी स्वत: पुढाकार घेत होर्मुझचा मार्ग सुरक्षित करत स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी घेत आपल्या फायद्यासाठी वापर करा असे म्हटले आहे.
Trump: We have sooo much gas under my leadership pic.twitter.com/DfmtUu1Jlo— Acyn (@Acyn) April 2, 2026


होर्मुझ बंद राहिल्यास कोणाला होणार फायदा?

होर्मुझ सामुद्रधुनीतून जगाच्या २०% तेल आणि वायूचा व्यापार होता. हा मार्ग बंद झाल्याने सागरी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुरवठ्यात निर्माण झालेल्या या व्यत्ययामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाची आणि द्रवरूप पेट्रोलियम वायूची (LPG) तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परंतु याचा सर्वात मोठा फायदा अमेरिकेला होण्याची शक्यता आहे.

सध्या सर्वाधिक तेलाचा साठ असलेला देश अमेरिका आहे. व्हेनेझुएलावरील ताब्यानंतर अमेरिकेची तेल शक्ती अफाट झाली आहे. तसेच अमेरिकेकडे तेल रिफायनरीज देखील आहे. गेल्या फेब्रुवारी २०२६ मध्येच अमेरिकेले व्हेनेझुएलाकडू ८० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल मिळाले होते. यामुळे ट्रम्प यांच्या माघार घेण्यामागे अर्थकारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी जगाला कोणती ऑफर दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी अमेरिकेकडे अफाल तेल साठा असून जगाने त्यांच्याकडून खरेदी करावी असे म्हटले आहे.

  • Que: होर्मुझचा मार्ग बंद झाल्यास कोणाला फायदा होणार?

    Ans: होर्मुझ मार्गावरुन जगाच्या एकूण कच्चा तेलाच्या पुरवठ्यापैकी २० टक्के पुरवठा जागतिक पातळीवर केला जाता. तज्ञांच्या मते, सध्या अमेरिकेकडे सर्वाधित तेल साठा आहे, तर व्हेनेझुएलाकडून मिळणारे तेलही आहे जे जगाने खरेदी केल्यास अमेरिकेला मोठा फायदा होईल.

Web Title: Donald trump on strait of hormuz crisis speech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
1

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका
2

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
3

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
4

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.