US Iran Relation : 'आम्ही तुमचे शत्रू नाही...' ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराणी जनतेच्या मनात अमेरिकन लोकांविषयी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक द्वेष किंवा शत्रूत्व नाही. तसेच सध्या सुरु असलेल्या संघर्षाची सुरुवात देखील त्यांनी केलेली नाही. त्यांनी हे पत्र प्रसिद्ध करताना टू द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे कॅप्शन दिले आहे. पेझेश्कियान यांनी पत्रात इराण संस्कृती आणि इतिहासाविषयीची चर्चा केली आहे.
पेझेश्कियान यांनी पत्रात म्हटले आहे की, इतिहासात किंवा सध्या वर्तमानकाळात अमेरिकन जनतेला इराण(Iran) कडून कोणताही धोका नाही. अमेरिका, युरोप किंवा इतर मित्र राष्ट्रांबद्दल इराणच्या मनात द्वेष नाही. तर त्यांना धोका म्हणून चित्रित करणे हा केवळ एक राजकीय आणि आर्थिक डाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पेझेश्कियान यांनी १९५३ मधील सत्तापालटाचा उल्लेख करत त्यांच्यावरील निर्बंध आणि लष्करी कायवायांमुळेच दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
याच वेळी पेझेश्कियान यांनी अमेरिका इस्रायल(Israel)च्या सांगण्यावरुन हे युद्ध लढत असल्याचा थेट आरोप केला. त्यांच्या मते, अमेरिका स्वत:च्या हितासाठी नव्हे, तर इस्रायलचा प्रॉक्सी म्हणून युद्ध लढत असल्याचे म्हटले.तसेच त्यांनी युद्धाच्या परिणामांचा उल्लेख करत जग सध्या अत्यंत नाजूक वळणावर पोहोचले असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, युद्ध अजूनही न थांबल्यास विनाशाच होईल इशारा दिला.
त्यांनी म्हटले की, अमेरिकेला इराणबद्दल जे सांगितले जात आहे, त्या पलीकडे जाऊन पहा. इराणच्या प्रगत, विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या लोकांना भेट द्या. यानंतर तुम्हाला खरे वास्तव लक्षात येईल असे म्हटले.
To the people of the United States of America pic.twitter.com/3uAL4FZgY7 — Masoud Pezeshkian (@drpezeshkian) April 1, 2026
Ans: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे.
Ans: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी १९५३ मधील सत्तापालटाचा सत्तापालटाचा उल्लेख केला. यानंतर त्यांच्यावरील निर्बंध आणि लष्करी कायवायांमुळे संबंध बिघडल्याचा आरोप केला.
Ans: पेझेश्कियान यांच्या मते, अमेरिका स्वत:च्या हितासाठी नाही, तर इस्रायलसाठी प्रॉक्सी म्हणून युद्ध लढत आहे.






