Donald Trump revokes Biden's security clearances
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांनी जागतिक स्तरवार खळबळ उडवून दिली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार करणे, तसेच बर्थराइट सिटीझनशिप संपुष्टात आणणे याशिवाय, जागतिक स्तरावर संघटनांमधून बाहेर पडणे, परकीय देशांवरील टॅरिफ, तर ग्रीनलॅंड आणि गाझावर नियंत्रण मिळवण्याच्या इच्छेपासून सध्या ट्रम्प चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्या या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणांत गोंधळ निर्माण झाला असून त्यांनी आणखी एक धक्का दिला आहे..
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत सध्या उलथापालथ सुरु आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या घोषणेत म्हटले आहे की, बायडेनचा गोपनीय माहितीवरील प्रवेश आता संपुष्टात आला आहे. जो तुम्हाला काढून टाकण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात गोंधळ सुरु आहे.
There is no need for Joe Biden to continue receiving access to classified information. Therefore, we are immediately revoking Joe Biden’s Security Clearances, and stopping his daily Intelligence Briefings. He set this precedent in 2021, when he instructed the Intelligence… — Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) February 7, 2025
यापूर्वी 2021 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना देखील जो बायडेन यांनी अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांचे गुप्तचर माहितीचे ब्रिफिंग थांबवले होते. राजकारण आता सुरक्षेच्या क्षेत्रातील एक मोठे पाऊल म्हटले जाते. याच पार्श्नभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांना काढून टाकल्याचे म्हटले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे निर्णय
डोनाल्ड ट्रम्पयांनी शपथ घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांनी अमेरिकेला WHO च्या सदस्यात्वातून बाहेर काढण्यापासून ते USAID ला बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर (ICC) मोठा निर्बंध आणत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय न्यायसंस्थांवर अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांचा दबाव वाढत आहे.
तसेच, हा निर्णय अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये मतभेद निर्माण करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांनी जागतिक राजकारणात देखील तणाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आणि अमेरिका यांच्यातील तणाव नवीन टप्प्यावर पोहोचला असून, पुढील काळात याचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे….