Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी सात युद्ध थांबवली…’, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली स्वत:चीच बढाई; जागतिक शांततेत अमेरिकेचा मोठा वाटा असल्याचा दावा

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्वत:ची बढाई केली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सात युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे आणि तेही जागतिक शांततेसाठी. त्यांच्या या दाव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 20, 2025 | 09:20 PM
Donald Trump says he stopped seven wars in press conference with starmer

Donald Trump says he stopped seven wars in press conference with starmer

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा सात युद्ध संपवल्याचा केला दावा
  • जागतिक शांततेसाठी प्रयत्न करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले
  • ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

Donald Trump on Wars : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची सवय झाली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरु, निर्णयावरुन, विधानावरुन ट्रम्प चर्चेत असतातच. नुकतेच त्यांनी H-1B व्हिसा शुल्कात वाढ करुन सर्वत्र खळबळ उडवली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी जागतिक शांततेसाठी सात युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांचे प्रमुख प्राधान्य जागतिक शांती प्रस्थापित करणे आहे. या दिशेने ते प्रयत्न करत असून राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी सात युद्ध संपवली आहे. सध्या ते रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, कोणालाही जे करता आले नाही, ते मी करुन दाखवले आहे. यामुळेच जगभरात तणाव कमी झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारतीयांना धक्का! H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क; जाणून घ्या काय होणार परिणाम?

ब्रिटनच्या दौऱ्यावर असाताना केला दावा

डोनाल्ड ट्रम्प नुकतेच ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले की, मी सात युद्ध थांबवली आहे. रशिया युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात कठीण आहे. मला वाटले होते पुतिन यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे ते सोपे असेल पण पुतिन यांना मला तोडांवर पाडले असा दावा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी म्हटले की, सध्या हे युद्ध अधिक गुंतागुतींचे आहे पण आपल्याकडे अजूनही वेळी आहे. हा प्रश्न नक्कीच सुटेल यासाठी त्यांनी चीनच्या शी जिनपिंग यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. ते नक्कीच मदत करतील असे ट्रम्प म्हणाले.

#BREAKING : Trump says that putin has let me down during UK Press conference pic.twitter.com/tRX6KrP9TY

— Dhruv Mishra (@DhruvMishra1607) September 18, 2025

ट्रम्प यांनी कोणती युद्ध थांबवल्याचा दावा केला

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह, इस्रायल-इराण थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान ही सात युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्रम्प यांनी सतत ही युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा तर २० हून अधिक वेळा ट्रम्प यांनी केला आहे.संयुक्त राष्ट्राच्या वर्धापन दिना दिवशी देखील ट्रम्प यांनी जागतिक शांततेत त्यांचा मोठा वाटा असून त्यांनी सात युद्ध थांबवली असल्याचे म्हटले. यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांचा मोठा हत असल्याचे ट्रम्प म्हणाले.

FAQs (संबंधित प्रश्न)

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय दावा केला? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात सात युद्ध थांबवली आहेत. तसेच त्यांच्या जागतिक शांतते ही युद्ध थांबवल्यामुळे मोठा वाटा आहे.

ट्रम्प यांनी कोणती युद्ध थांबवली? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह, इस्रायल-इराण थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान ही सात युद्धं थांबवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इराणच्या Nuclear Program वरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा वाद; अराघची यांनी E-3 देशांच्या ‘या’ कारवाईमुळे केला संताप व्यक्त

Web Title: Donald trump says he stopped seven wars in press conference with starmer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

युक्रेनची जमीन पुन्हा हादरली! रशियाचा ६०० हून अधिक ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा, अनेक जखमी
1

युक्रेनची जमीन पुन्हा हादरली! रशियाचा ६०० हून अधिक ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा, अनेक जखमी

Cyber Attack : युरोपमधील तीन प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ला; शेकडो उड्डाणे रद्द
2

Cyber Attack : युरोपमधील तीन प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ला; शेकडो उड्डाणे रद्द

अमेरिकेतील अणुउर्जा प्रकल्प सुरक्षितपणे आला पाडण्यात; कुलिंग टॉवर क्षणात धुळीस, VIDEO VIRAL
3

अमेरिकेतील अणुउर्जा प्रकल्प सुरक्षितपणे आला पाडण्यात; कुलिंग टॉवर क्षणात धुळीस, VIDEO VIRAL

H1-B शिवाय गूगलही अस्तित्वात राहणार नाही,अमेरिकेचे ‘secret weapon’; मिचियो काकू यांची भविष्यवाणी VIRAL
4

H1-B शिवाय गूगलही अस्तित्वात राहणार नाही,अमेरिकेचे ‘secret weapon’; मिचियो काकू यांची भविष्यवाणी VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.