Donald Trump says India imposes the highest tariffs on US
Trump on India Tariff : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. स्कॉट जेनिग्ज रेडिओ शोदरम्यान ट्रम्प यांनी भारताने सर्व टॅरिफ संपवण्याची ऑफर दिली होती असा दावा केला आहे. पण ही ऑफर त्यांनी भारतावर टॅरिफ (Tariff) लादल्यानंतर मिळाली असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत हा अमेरिकेवर सर्वाधिक टॅरिफ लावणार देश आहे. जर त्यांनी भारतावरही तितकेच टॅरिफ लादले नसते, तर भारताने अशी ऑफर कधीच दिली नसती.
डोनल्ड ट्रम्प यांनी भारताला सर्वाधिक कर लादणार देश म्हणून संबोधले. तसेच त्यांनी म्हटले की, चीन आमच्यावर टॅरिफ लादून आम्हाला मारत आहे, आणि भाारत, ब्राझीलही तेच करत आहेत. यामुळे मला आता माणसापेक्षा जास्त टॅरिफ ओळखता येत आहे. यामुळेच अमेरिकेला वाटाघाटाची ताकद मिळाली आहे.
यावेळी ट्रम्प यांनी हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींचे उदाहरण देत म्हटले की, भारताने या ब्रॅंडवर २००% शुल्क लादले होते. यामुळे कंपनीला भारतातच एक उत्पादन प्लांट उभारावा लागला. ट्रम्प यांनी म्हटले की, भारताच्या जास्त शुल्कामुळे अमेरिकन कंपन्या भारतात गुंतवणूक करु शकत नाहीत.
मात्र सध्या ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे अमेरिकेतही त्यांच्यावर टीका केली जात आहे. अमेरिकन अर्थतज्ज्ञांच्या मते, यामुळे अमेरिकन ग्राहकांना आणि उत्पादकांना जास्त नुकसान होत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी देखील ट्रम्प पाकिस्तानमधील खनिजांच्या साठ्यासाठी भारतासोबतचे धोरणात्मक संबंध कमकुवत करत आहेत.
शिवाय माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी देखील ट्रम्प यांनी भारतावर कर लादून चूक केली असल्याचे म्हटले आहे. बोल्टन यांनी अमेरिका आणि भारतामध्ये विश्वासहार्यता निर्माण करण्यासाठी अनेक दशकले गेली, मात्र ट्रम्प यांनी या प्रयत्नांवर पाणी फेरले असल्याचे म्हटले आहे.
तसेच निक्की हेली यांनी देखील ट्रम्प चीनला जवळ करुन भारतासारख्य मित्र देशाच्या विरोधी जाऊन मोठी चूक करत असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प भारतावर का आहेत नाराज?
सध्या भारताने अमेरिकेवर ५०% कर लादला आहे. यामध्ये २५% कर आणि अतिरिक्त २५% दंड ट्रम्प यांनी लागू केला आहे. ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची मागणी केली आहे. मात्र भारताने याला स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्या मते, भारत रशियाकडून तेल खरेदी करुन युक्रेनविरुद्धच्या युद्धात त्यांना आर्थिक मदत करत आहे. यामुळे युद्ध अधिक भडकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शिवाय यापूर्वी भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेयही भारताने ट्रम्प यांना घेऊन दिले नाही. तसेच अमेरिकेन भारतीय बाजारपेठांमध्ये स्थान मिळत नसल्याच्या कारणावरुनही ट्रम्प नाराज असल्याचे दिसून येते असे तज्ज्ञाचे मत आहे.
पाकिस्तानला मोठा धक्का! TRF च्या परकीय निधीचा खेळ उघड; एनआयएचा मोठा खुलासा