पाकिस्तानला मोठा धक्का! TRF च्या परकीय निधीचा खेळ उघड; एनआयएचा मोठा खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News in marathi : इस्लामाबाद : ऑपरेशन सिंदूर (Operations Sindoor ) मोहीमेत भारताने पाकिस्तानच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. तसेच जागतिक स्तरावर पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंब्याचा पर्दाफाशही केला होता. मात्र तरीही पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेत नाही.
पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे सुरु झाले आहे. नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानची दहशतवादी संघटना द रेझिस्टंट फ्रंट (TRF) ला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. पण आता या संघटनेसाठी पुन्हा एकदा लष्करी प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय ही संघटना परदेशी निधीवर चालते हे देखील NIA ने उघड केले आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. TRF ही संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुखवटा आहे.
भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या दहशतवादी संघटनेबाबत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. NIA च्या तापासा आढळून आले आहे की, पाकिस्तानला आणि TRF दहशतवादी संघटनेला परदेशी निधीतून ताकद मिळत आहे. अहवालानुसार, लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तान TRF च्या मागे लपून काश्मीरमधील दहशतवादी खेळ घडवत आहे. २०१९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. याचा उद्देश लष्कर-ए-तैयबाच्या दहशदतवादी कारवायांना एक नवा चेहरा देणे होता.
पाकिस्तानतचा खेळ आता संपणार?
मात्र NIA च्या या खुलास्याने पाकिस्तानचा आणि लष्कर-ए-तैयाबाचा खेळ संपणार आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांना स्थानिक बंडखोर म्हणून नाव देण्याचा प्रयत्न आणि जगला मूर्ख बनवण्याचा पाकिस्तानचा हेतू उघड झाला आहे.
NIA ने तपासात सिद्ध केले आहे की, TRF ही स्वतंत्र्य संस्था नसून पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाच्या तालावर नाचणारी संघटना आहे.
परकीय निधीचे जाळे
NIA च्या अहवालानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये TRF चे नेटवर्क खोलवर रुतले असल्याचे समोर आले आहे. या संघटनेला दहशतवादी कारवायांसाठी परकीय निधी दिली जातो. तपासादरम्यान NIA ला आढळून आले आहे की, सज्जाद अहमद मीर नावाची व्यक्ती मलेशियातून हा निधी पूरवते.
TRF आणि संशयित अहमद मीर सतत संपर्कात असतात. TRF साठी निधी उभारण्यासाठी मीर प्रयत्न करत असतो. मीरने आतापर्यंत मलेशियातून ९ लाख निधी जमा केला आहे. ही रक्कम TRF च्या कार्यकर्ता शफत वाणीपर्यंत पोहोचवली जाते. शफत वाणी हा टीआरएफचा महत्वाचा माणूस आहे.
या अनेक वेळा मलेशियाला भेट दिली असून त्याने मीर अहमदकडून पैसे घेतले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. NIA ने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवाद्यांची तळे उभारण्यासाठी करत आहे. परदेशातून पाकिस्तानी नागरिकांनाच्या द्वारे हे पैसे गोळा केले जात आहे.
सध्या NIA यावर अधिक पुरावे गोळा करत आहे. या प्रकरणाची खोलवर चौकशी केली जात आहे. लवकरच यावरही फास आवळता येईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे पुन्हा एकदा भारताला पाकिस्तानचा जागतिक स्तरावर खरा चेहरा उघड करण्याची संधी मिळणार आहे.
‘मी खूप ॲक्टिव होतो’ ; डोनाल्ड ट्रम्पने सोशल मीडियावरील आजाराच्या अफवांना दिला पूर्णविराम