आपल्या बोटांचे ठसेही मागे ठेवत नाही किम जोंग उन; ज्या गोष्टीला हात लावतील ती केली जाते स्वच्छ! VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Kim Jong Un News : प्योंगयोंग : नुकतेच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी चीनला भेट दिली. यावेळी ते चीनच्या ऐतिहासिक लष्करी परेडमध्ये सहभागी झाले होते. ही परेड दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची आणि जपानवर चीनने मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या विशेष सोहळ्यासाठी चीनने किम जोंग ऊन यांना आंमत्रित करण्यात आले होते.
किम जोंग उन त्यांच्या क्रूर आणि निर्दयी वृत्तीसाठी ओळखले जातात. तसेच अमेरिका आणि तैवानसाठी त्यांना मोठा धोकाही मानले जाते. किम जोंग उन सहसा परदेश दौऱ्यावर जात नाहीत. यामुळे चीनच्या त्यांच्या दौऱ्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवाय परिषदेत रशिया आणि उत्तर कोरिया हे दोन अमेरिकेचे मोठे शत्रू एकत्र आले होते. तसेच चीनही अमेरिकेचा मोठा शत्रू आहे. यामुळे हे पुतिन-जिनपिंग-किम हे त्रिकुट अमेरिकेसाठी चिंतेचा कारण बनत आहे.
सध्या या दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. याच वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एक्सवर @smitaprakash यांनी शेअर केला आहे. सीमाप्रकाश या इंटरनॅशन आशियाई न्यूज एडिटर आहेत. त्यांना हा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे की, किम जोंग उन जिथे भेटीसाठी जातात, तिथून गेल्यानंतर त्यांचे फिंगरप्रिंटही, वैगेरे सर्वाकाही साफ केले जाते. यामध्ये किम जोंग उनचे बॉडीगार्ड साफसफाई करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडिओतील दृश्यावरुन लक्षात येेते की, किम जोंग उन कधीही कोणताही धोका पत्कारत नाही, कोणताही सुराग मागे सोडत नाही. शिवाय किम जोंग उन यांच्याबदद्ल देखील बऱ्याच अशा गोष्टींचा उलगडा झालेला नाही. त्यांच्याबाबत म्हटले जाते की, त्यांनी त्यांच्या सख्या काकांना तोफेला बांधून उडवण्याचे आदेश दिले होते. त्यांचे नाव ऐकताच सर्वजण थरथर कापायाला लागतात. उत्तर कोरियामध्येही त्यांची मोठी दहशत आहे.
Interesting, everything that Kim Jong Un has touched is wiped clean after he departs from a location
pic.twitter.com/eYaPayurFE— Smita Prakash (@smitaprakash) September 3, 2025
यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबाबातही अशाच एका चर्चेला उधाण आले होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांच्या बॉडीगार्डकडे एक खास सुटकेस आहे. यामध्ये पुतिन यांचा मानवी कचरा म्हणजे मलमूत्रज्ञ जमा केले जाते. यामागाचे कारण म्हणजे पुतिन कोणत्याही देशात गेल्यावर आपल्या फूटप्रिंट मागे सोडत नाहीत. मग ते ह्यूमन वेस्टही नाही.
‘मी खूप ॲक्टिव होतो’ ; डोनाल्ड ट्रम्पने सोशल मीडियावरील आजाराच्या अफवांना दिला पूर्णविराम