
donald trump threatens norway pm nobel peace prize snub greenland tariffs 2026
Donald Trump Nobel Peace Prize Norway threat : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जागतिक राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर आहे शांततेचा नोबेल पुरस्कार देणारा देश ‘नॉर्वे’. ट्रम्प यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोर यांना एक अत्यंत आक्रमक आणि अनपेक्षित पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नोबेल पुरस्कार न मिळाल्याचा राग व्यक्त करत, आता आपण शांततेऐवजी केवळ ‘अमेरिकेच्या हिताचा’ (America First) विचार करू, असा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्रात थेट नॉर्वेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी लिहिले की, “तुमच्या देशाने मी ८ पेक्षा जास्त युद्धे रोखूनही मला ‘नोबेल शांतता पुरस्कार’ न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मला शांततेबद्दल विचार करण्याची कोणतीही नैतिक जबाबदारी वाटत नाही. आता मी केवळ तेच करेन जे अमेरिकेसाठी योग्य आणि चांगले आहे.” ट्रम्प यांचा हा रोख प्रामुख्याने ग्रीनलँड (Greenland) या बेटाकडे असून, त्यांनी नॉर्वेला सांगितले आहे की त्यांनी डेन्मार्कवर हे बेट अमेरिकेला सोपवण्यासाठी दबाव टाकावा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Human Rights: इस्लामचा रक्षक की भक्षक? ‘मशिदींच्या भिंती बोलू लागल्या, कुराणेही जाळली’; बलुच नेत्याने केला पाकिस्तानचा पर्दाफाश
ट्रम्प यांनी आपल्या संदेशात ग्रीनलँडवर रशिया किंवा चीनचा हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला की डेन्मार्क हे बेट सुरक्षित ठेवण्यास असमर्थ आहे. “नाटो (NATO) गेल्या २० वर्षांपासून डेन्मार्कला रशियन धोका दूर करण्यास सांगत आहे, पण त्यांनी काहीही केले नाही. आता वेळ आली आहे आणि हे काम (ग्रीनलँड ताब्यात घेणे) पूर्ण केले जाईल,” असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या कार्याची तुलना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या २००९ च्या नोबेल पुरस्काराशी करत, आपण एकट्याने बीजिंग आणि मॉस्कोचा दबदबा निर्माण केला असल्याचा दावाही केला.
President Trump letter to Norway Prime Minister links Nobel Prize to Greenland, reiterates threats; shared with European ambassadors in Washington. – PBS’ Nick Schifrin pic.twitter.com/GAHr019PfK — NewsWire (@NewsWire_US) January 19, 2026
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
ट्रम्प यांनी केवळ पत्राद्वारे धमकी दिली नाही, तर आर्थिक नाकेबंदीचीही तयारी केली आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून फ्रान्स, जर्मनी, युके, डेन्मार्क, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड या देशांतील वस्तूंवर १०% अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जर १ जूनपर्यंत ग्रीनलँडबाबत कोणताही करार झाला नाही, तर हे शुल्क २५% पर्यंत वाढवले जाईल. याला युरोपीय नेत्यांनी ‘आर्थिक ब्लॅकमेल’ असे संबोधले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Ranking: ड्रॅगनची कमाल! संपूर्ण जगात जिथे हार्वर्डच होता शिक्षणविश्वाचा निर्विवाद सम्राट, तिथेच चीनने फडकवला विजयध्वज
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी स्पष्ट केले आहे की, ग्रीनलँड विक्रीसाठी नाही आणि अशा धमक्यांसमोर डेन्मार्क झुकणार नाही. नॉर्वेनेही ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी आपले सैन्य तैनात करण्याची तयारी दर्शवली आहे. जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ आणि फिनलंडचे अलेक्झांडर स्टब यांनी डेन्मार्कला पूर्ण पाठिंबा दिला आहे. ब्रुसेल्समध्ये सध्या युरोपीय युनियनचे राजदूत ट्रम्प यांच्या या व्यापार युद्धाला कसे उत्तर द्यावे, यावर चर्चा करत आहेत.
Ans: ट्रम्प यांच्या मते त्यांनी जगातील ८ युद्धे थांबवली असूनही नॉर्वेच्या नोबेल समितीने त्यांना शांतता पुरस्कार दिला नाही. याच रागातून त्यांनी नॉर्वेला ग्रीनलँड प्रकरणात मदत करण्यास सांगितले आहे.
Ans: ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या अखत्यारीत येणारे एक स्वायत्त बेट आहे. ट्रम्प यांना हे बेट अमेरिकेच्या संरक्षणासाठी विकत घ्यायचे आहे.
Ans: ट्रम्प यांनी १ फेब्रुवारीपासून ८ युरोपीय देशांच्या वस्तूंवर १०% आयात शुल्क लादले आहे, जे भविष्यात २५% पर्यंत वाढू शकते.