Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : ‘आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका!’ अमेरिकेसह मध्यस्थी करणाऱ्या देशांना इराणचा कडक इशारा

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी जगाला एक कडक संदेश दिला आहे. "आम्हाला शांतता हवी आहे, पण ती आमच्या स्वाभिमानाशी तडजोड करून नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला बाणा स्पष्ट केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 07:53 PM
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी जगाला कडक संदेश
  • इराणचा स्वाभिमानी पवित्रा
  • अमेरिकेचे ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अधिक आक्रमक
Iran-US War : मध्य-पूर्वेतील युद्ध आता एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन पोहोचले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आणि अमेरिकेच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’मुळे झालेल्या पडझडीनंतर, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी जगाला एक कडक संदेश दिला आहे. “आम्हाला शांतता हवी आहे, पण ती आमच्या स्वाभिमानाशी तडजोड करून नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला बाणा स्पष्ट केला आहे.

Nepal Election Results : नेपाळमध्ये मोठा सत्ताबदल! आता अमेरिका समर्थक सरकार? भारत चीनचं टेन्शन वाढणार?

इराणचा स्वाभिमानी पवित्रा

राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, अनेक देश सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, “शत्रूने आम्हाला कमकुवत समजण्याची चूक करू नये. खामेनेई यांच्या निधनानंतर काही लोकांना वाटले असेल की आम्ही झुकू, पण आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी लढायला कचरणार नाही.”

युद्धाचा भडका: इराणचे प्रतिहल्ले

एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असतानाच, इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा नवा मारा सुरू केला आहे. यामध्ये इराणचे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र ‘खोर्रमशहर-४’ वापरले जात असल्याचे वृत्तात सांगितले आहे. दुसरीकडे, दक्षिण लेबनानमधील शिडोन शहरात इस्रायलने हवाई हल्ला केला असून, एका निवासी इमारतीला लक्ष्य केले आहे. यामुळे या भागात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अधिक आक्रमक

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले आहे की, इराणची लष्करी शक्ती पूर्णपणे मोडीत काढल्याशिवाय अमेरिका थांबणार नाही. गेल्या ७२ तासांत अमेरिकन बॉम्बर्सनी इराणमधील २०० ठिकाणांवर बॉम्बफेक केली आहे. अमेरिकेने दावा केला आहे की इराणच्या नौदलाचा मोठा भाग आता लढाईसाठी उरलेला नाही. ऐतिहासिक मिशन असं म्हणत, “आम्ही हे युद्ध जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो आहोत,” असे म्हणत हेगसेथ यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक केले आहे.

शेजारील देशांनाही फटका: कुवेतमध्ये खळबळ

या युद्धाची झळ आता इतर देशांनाही बसू लागली आहे. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानुसार, इराणच्या तणावामुळे कुवेतचे 67 लष्करी कर्मचारी जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत कुवेतच्या हवाई हद्दीत आलेले 212 बॅलिस्टिक मिसाइल आणि 394 ड्रोन कुवेतच्या लष्कराने पाडले आहेत. कुवेतने आपले सैन्य 24 तास हाय अलर्टवर ठेवले आहे.

इराणने आपली पूर्ण ताकद लावून लढण्याचा निर्धार केला आहे, तर अमेरिका आणि इस्रायल इराणच्या मिसाइल तंत्रज्ञानाचा मुळापासून नायनाट करण्याच्या तयारीत आहेत. जगातील अनेक देश मध्यस्थी करत असले तरी, दोन्ही बाजूंचा आक्रमक पवित्रा पाहता हे युद्ध लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Iran-US War: इराण आता तडजोडीसाठी तयार? ट्रम्प यांचा मोठा दावा!

Web Title: Iran us war iran strong warning to america and mediators 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना
1

Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना

भारताला या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागणार; Iran-Israel संघर्षावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
2

भारताला या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागणार; Iran-Israel संघर्षावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Iran-US War: इराण आता तडजोडीसाठी तयार? ट्रम्प यांचा मोठा दावा!
3

Iran-US War: इराण आता तडजोडीसाठी तयार? ट्रम्प यांचा मोठा दावा!

Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत
4

Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.