Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना

मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कतारमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर, कतारची राजधानी दोहा येथील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तातडीची नियमावली प्रसिद्ध केली आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 06:47 PM
( फोटो सौजन्य : IANS )

( फोटो सौजन्य : IANS )

Follow Us
Follow Us:
  • भारतीय नागरिकांसाठी तातडीची नियमावली प्रसिद्ध
  • सुरक्षेसाठी काय करावे?
  • विमानसेवा आणि व्हिसाबाबत महत्त्वाची अपडेट
Iran-US War : मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कतारमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर, कतारची राजधानी दोहा येथील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तातडीची नियमावली (Advisory) प्रसिद्ध केली आहे. भारतीयांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

Iran-US War: इराण आता तडजोडीसाठी तयार? ट्रम्प यांचा मोठा दावा!

सुरक्षेसाठी काय करावे?

दूतावासाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच, संभाव्य धोका टाळण्यासाठी खिडक्या आणि उघड्या जागांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

विमानसेवा आणि व्हिसाबाबत महत्त्वाची अपडेट

सध्या कतारमधील हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्यात आले असून सर्व विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित आहेत. या संदर्भात कतर एअरवेज 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नवीन माहिती जाहीर करणार आहे, तोपर्यंत प्रवाशांनी आपल्या एअरलाईन्सच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. व्हिसाबाबत दिलासा देताना कतारच्या अंतर्गत मंत्रालयाने जाहीर केले आहे की, ज्यांचे प्रवेश व्हिसा संपले आहेत किंवा संपणार आहेत, अशा सर्व श्रेणीतील व्हिसाची मुदत एका महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. ही सवलत 28 फेब्रुवारी 2026 पासून प्रभावी मानली जाईल आणि गरजेनुसार यात आणखी वाढ केली जाऊ शकते.

कतारबाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग

ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत कतारमधून बाहेर पडायचे आहे, त्यांच्यासाठी सौदी अरबकडे जाणारी ‘सलवा’ भू-सीमा सध्या खुली ठेवण्यात आली आहे. ज्या भारतीय नागरिकांकडे अमेरिका, ब्रिटन किंवा शेंगेन देशांचा वैध व्हिसा आहे, त्यांना सौदी अरबमध्ये पोहोचल्यावर लगेच व्हिसा मिळू शकतो. इतर नागरिकांना ठराविक प्रक्रियेनुसार सौदी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. जे भारतीय नागरिक सध्या कतारमध्ये विमान प्रवासाच्या ट्रान्झिटमध्ये अडकले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी भारतीय दूतावास सौदी अरबचा तात्पुरता ट्रान्झिट व्हिसा मिळवून देण्यासाठी विशेष नोंदणी लिंक सुरू करत आहे.

मदतीसाठी हेल्पलाईन नंबर

ही ट्रान्झिट व्हिसाची सुविधा मिळवण्यासाठी प्रवाशांकडे सौदी अरबमधून बाहेर जाण्याचे निश्चित विमान तिकीट असणे आवश्यक आहे. नोंदणी करताना कतारला येण्याचे आणि सौदीतून बाहेर जाण्याचे तिकीट जमा करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी दूतावासाला किमान 48  तासांचा वेळ लागणार असून, सीमेपर्यंत जाण्याची आणि पुढील प्रवासाची व्यवस्था नागरिकांना स्वतःच करावी लागेल. अधिक माहिती किंवा आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाने +97455647502 किंवा +97455362508 हे हेल्पलाईन नंबर देखील जारी केले आहेत.

Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

Web Title: Indian embassy qatar advisory for indians travel safety 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार
1

US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
2

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
3

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
4

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.