Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War: भारताच्या दारापर्यंत युद्धाची ठिणगी; ट्रम्प प्रशासनाचा इराणी नौदलावर मोठा प्रहार, काय आहे अमेरिकेचं गुप्त प्लॅनिंग?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणच्या नौदलाचे (Navy) अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 04:00 PM
एपस्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव; अनेक अल्पवयीन मुलींचे केले लैंगिक शोषण

एपस्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव; अनेक अल्पवयीन मुलींचे केले लैंगिक शोषण

Follow Us
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान
  • भारताच्या सीमेजवळच अमेरिकेचा हल्ला
  • इराणच्या सागरी ताकदीवर अमेरिकेचा प्रहार
Iran-US War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणच्या नौदलाचे (Navy) अस्तित्व पूर्णपणे मिटवून टाकेल. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेने केवळ शब्दच वापरले नाहीत, तर प्रत्यक्ष कारवाईलाही सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’नुसार, आतापर्यंत त्यांनी इराणच्या ३० पेक्षा जास्त युद्धनौका उद्ध्वस्त केल्या आहेत. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेने इराणची एक युद्धनौका भारताच्या अगदी जवळ असलेल्या श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ पाणबुडीतून टॉर्पेडो डागून बुडवली.

अमेरिकेला इराणच्या नौदलाची भीती का वाटते?

इराणकडे अण्वस्त्रे किंवा मिसाइल्स आहेतच, पण अमेरिकेसाठी इराणची नौदल शक्ती हा सर्वात मोठा धोका आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ . हा समुद्रमार्ग इराण आणि युनायटेड अरब अमिरात यांच्यामध्ये आहे. जगातील एकूण नैसर्गिक वायूच्या Natural Gas पुरवठ्यापैकी पाचवा हिस्सा याच मार्गावरून जातो. इराणने अनेकदा हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. आणि जर हा मार्ग बंद झाला, तर संपूर्ण जगाचा पुरवठा विस्कळीत होईल. आणि त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसह प्रत्येक घटकावर होईल.

 

U.S. forces aren’t holding back on the mission to sink the entire Iranian Navy. Today, an Iranian drone carrier, roughly the size of a WWII aircraft carrier, was struck and is now on fire. pic.twitter.com/WyA4fniZck — U.S. Central Command (@CENTCOM) March 6, 2026

अमेरिकन आक्रमणाची सद्यस्थिती

अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’नुसार, आतापर्यंत अमेरिकन सैन्याने इराणची ३० हून अधिक युद्धनौके आणि जहाजे उद्ध्वस्त केली आहेत. यात एक अत्यंत गंभीर घटना म्हणजे, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ भारताच्या सीमेजवळच अमेरिकेने एका पाणबुडीद्वारे टॉर्पेडो हल्ला करून इराणची एक युद्धनौका बुडवली.

इराणची ‘दोन’ नौदले: अमेरिकेसाठी डोकेदुखी

१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणने आपली समुद्री शक्ती दोन भागांत विभागली आहे:
पारंपारिक नौदल ज्याला Regular Navy असंही म्हणतात आणि दुसरं म्हणजे रिव्होल्युशनरी गार्ड्स म्हणजेच IRGC Navy. पारंपारिक नौदल हे मोठे जहाज आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने खोल समुद्रात काम करतं. तर रिव्होल्युशनरी गार्ड्स हे नौदल प्रामुख्याने आखाती देशांत आणि इराणच्या किनारपट्टीवर सक्रिय असते. हे छोटे, अतिशय वेगवान जहाज वापरून ‘छापामार’ म्हणजेच युद्ध Guerrilla Warfare करण्यात पारंगत आहे.

इराणच्या सागरी ताकदीवर अमेरिकेचा प्रहार

ड्रोन कॅरिअर: इराणने ‘शाहिद बाघेरी’ नावाचे ड्रोन कॅरिअर बनवले होते, ज्यावरून ‘शाहेद’ सीरिजचे ड्रोन लाँच करता येत होते. अमेरिकेने युद्धाच्या सुरुवातीच्या काही तासांतच हे जहाज बुडवले. IRIS Makran हे एक विशाल जहाज असून समुद्रात चालत्या-फिरत्या मिलिटरी बेससारखे काम करते. ज्यावर हेलिकॉप्टर आणि स्पेशल फोर्सेस तैनात असतात.
इराणकडे सुमारे 25 पाणबुड्या आहेत, ज्यात रशियन बनावटीच्या ‘किलो-क्लास’ आणि स्वदेशी ‘घादिर’ व ‘नाहंग’ क्लासच्या छोट्या पाणबुड्यांचा समावेश आहे. या पाणबुड्या उथळ पाण्यात लपून हल्ला करण्यासाठी वापरण्यात येतात. IRGC चे नौदल समुद्रात सुरुंग  बिछवण्यामध्ये पटाईत आहे, ज्यामुळे सागरी वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते.

अमेरिकन नौदलाच्या मूल्यांकन अहवालात काय?

अमेरिकन नौदलाच्या मूल्यांकन अहवालानुसार,  आयआरजीसीचे नौदल त्यांच्या हद्दीत सुरुंग टाकण्याच्या रणनीतींमध्ये माहिर आहे. शिवाय, इराणी नौदलाने पाणबुड्या आणि लहान बोटींसह अशा जहाजे मिळवली आहेत जी सुरुंग टाकण्यास आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शिपिंग वाहतूक विस्कळीत करण्यास सक्षम आहेत. डिफेंस इंटेलिजेंस फर्म ‘जेन्स’च्या माहितीनुसार, इराणच्या नौदलात 8 फ्रिगेट, 3 सबमरीन आणि 2 कॉर्वेट्ससह शेकडो लहान वेगवान बोटी आहेत. इराणचा हा ‘गुरिल्ला नेव्ही’चा ताफा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत होता, म्हणूनच अमेरिकेने सुरुवातीलाच त्यांच्या या सागरी ताकदीला लक्ष्य केले आहे. इराणची ‘होर्मुज’ बंद करण्याची धमकी मोडीत काढण्यासाठी अमेरिकेने ही ‘क्लीन-अप’ मोहीम हाती घेतली असल्याचं समोर येत आहे.

Web Title: Donald trump wants to destroy iranian navy know capabilities structure strength strategy and us fear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार
1

US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
2

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
3

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
4

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.