फोटो सौजन्य सोशल मीडिया
असे उद्गार त्यांनी एका सभेच्या वेळी काढले आहे . डेमोक्रॅट्स सत्तेत आल्यास देशातील सध्याची आर्थिक प्रगती धोक्यात येईल, असा दावा करत त्यांनी मतदारांना रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
निवडणूक प्रचारसभांमध्ये ट्रम्प सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधत आहेत. डेमोक्रॅट्सनी काँग्रेसवर नियंत्रण मिळवल्यास देशात अराजकता निर्माण होईल, असे चित्र त्यांनी मतदारांसमोर मांडले आहे. त्यांच्या मते, रिपब्लिकन सरकारने राबवलेल्या आर्थिक धोरणांना डेमोक्रॅट्सकडून विरोध होईल आणि त्यामुळे अमेरिकेच्या विकासाला खीळ बसेल. काही प्रचारसभांमध्ये त्यांनी डेमोक्रॅट्स सत्तेत आल्यास १९२९ सारखी महामंदी येऊ शकते, असाही दावा केला आहे.
अमेरिकेत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यावधी निवडणुका होणार आहेत. प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागा आणि सिनेटच्या ३५ जागांसाठी मतदान होणार आहे. सध्या काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठे आव्हान ट्रम्प यांच्यासमोर आहे. दुसरीकडे, डेमोक्रॅटिक पक्ष महागाई, इंधन दर, आरोग्यसेवा आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरत आहे.
या निवडणुकीत अमेरिकेची अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणांमुळे आणि इराण युद्धाच्या परिणामांमुळे इंधनाच्या किमतींबाबत चिंता वाढली आहे. डेमोक्रॅट्स सत्तेत आल्यास सरकारच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विविध निर्णयांची चौकशी करण्याची भूमिका घेत आहेत.
त्यामुळे आगामी निवडणूक ट्रम्प यांच्या नेतृत्वाचीही परीक्षा मानली जात आहे. रिपब्लिकन पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी ट्रम्प यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून, अमेरिकेच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.






