Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे पाकिस्तानची उडाली झोप; जाणून घ्या नेमके काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच पाकिस्तानची झोप उडाली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्याच भाषणात पाकिस्तानसाठी कडक संदेश दिला आहे. ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर दबाव वाढवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2025 | 05:10 PM
Donald trump warns Pakistan

Donald trump warns Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अवघ्या 6 तासांत 78 निर्णय घेतले आहेत. अमेरिकेच्या संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार आगमन केले आहेत भारतासह अनेक देशांना 100% टक्के कर लादण्याची धमकी देण्यापासून, ते जागतिक आरोग्य संघटनेतून सदस्यत्व काढून घेऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. या सर्व निर्णयांनी जगभरात एक वादंग निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी जगाला येत्या कार्यकाळात अमेरिकेची भूमिका कशी असेल याचा ट्रेलर दाखवला आहे.

जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या या भूमिकेवर काय पडसाद उमटतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच पाकिस्तानची झोप उडाली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्याच भाषणात पाकिस्तानसाठी कडक संदेश दिला आहे. ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर दबाव वाढवला आहे. त्यांनी जाहीर केले की, अमेरिका आता ड्रग तस्करांना दहशतवाद्यांचा दर्जा देईल आणि कोणत्याही देशाला विनामूल्य मदत देण्याच्या धोरणावर पुनर्विचार करेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अवघ्या 6 तासांत ट्रम्प यांनी घेतले 78 निर्णय; अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

पाकिस्तानचा गैर-नाटो सहयोगी देशाचा दर्जा येणार धोक्यात

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान अमेरिकेच्या प्रमुखे गैर नाटो सहयोगी देश आहे. या विशेष दर्जामुळे दरवर्षी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची आर्थिक मदत मिळते. मात्र, ट्रम्प यांच्या वक्तव्याने स्पष्ट संकेत मिळत आहेत की, हा दर्जा रद्द करण्याचा विचार सुरु आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्याता आहे. कारण अमेरिकेची मदत ही पाकिस्तानसाठी महत्त्वाची मानली जाते.

दहशतवाद आणि ड्रग तस्करांवर ट्रम्प यांची कठोर भूमिका

ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाची दहशतवाद आणि ड्रग तस्करांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ड्रग तस्करांना दहशतवाद्यांच्या श्रेणीत ठेवण्यात येईल. यामुळे त्यांच्यावर कठोर निर्बंध लादता येतील. पाकिस्तानवर दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचा आरोप अनेक वेळा करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

पाकिस्तानसाठी वाढणारी चिंता

अमेरिकेने पाकिस्तानचा गैर-नाटो सहयोगी देशाचा दर्जा काढून घेतला, तर पाकिस्तानला दरवर्षी मिळणारी आर्थिक मदत थांबेल. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल. अमेरिकेची मदत थांबल्यास पाकिस्तानला आर्थिक पुनर्बांधणीसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागेल.

अमेरिकन संसदेत प्रस्ताव

यापूर्वी देखील अमेरिकन संसदेत पाकिस्तानचा गैर-नाटो सहयोगी दर्जा संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. रिपब्लिकन पक्षाचे नेते अँडी बिग्स यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी संघटनांवर कारवाई केली नाही, तर त्याचा दर्जा रद्द केला जाईल असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानवर मोठा दबाव येणार आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी पाकिस्तानला पावले उचलावी लागतील, अन्यथा त्याचा आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठा परिणाम होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांनी रद्द केले अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्व; काय होईल भारतीयांवर याचा परिणाम?

Web Title: Donald trump warns pakistan know the detils

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Donald Trump
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड
1

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
2

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी
3

Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी

Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल
4

Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.