
donald trump air force one plane
नोबेल पुरस्कारासाठी वेडे झाले ट्रम्प! १, २ नव्हे थेट ८ पुरस्काराची केली मागणी; म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे सुरक्षितपणे वॉशिंग्टन येथील विमानतळावर लँडिंग करण्यात आले आहे. उड्डाणाच्या तासाभरानंतर हा बिघाड झाला होता, यामुळे विमान जॉइंट बेस अँड्र्यूज येथून परतले आहे. व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी याची पुष्टी केली असून विमानात कोणताही मोठा तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यांनी सांगितले की टेक-ऑफनंतर काही काळासाठी विमानातील लाईट बंद झाली होती, यामुळे विमान परतले. दरम्यान विमानातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. परंतु दौऱ्याला उशिर होत असल्याने ट्रम्प दुसऱ्या विमानाने स्वित्झर्लंडला रवाना झाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प या विमानाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) या वार्षिक बैठक परिषदेसाठी रवाना झाले होते. ही बैठक २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा ५६ व्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प देखील या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक आंतरराष्ट्रीय बिगर-नफा (Non-Profit) संस्था आहे. ही संस्था जागतिक स्तरावर खाजगी आणि सार्वजनिक सहकार्यासाठी कार्य करते. या संस्थेचा उद्देश जगातील व्यावसायिक, शैक्षणिक, आणि इतर क्षेत्रातील नेत्यांन एकत्र आणून जागतिक, प्रादेशिक आणि औद्योगिक अजेंडा निश्चित करणे आहे. या परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख, मोठ्या कंपन्यांचे सीईओ, तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतात.
Air Force One हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान गेल्या ४० वर्षांपासून उड्डाण करत आहे. हे विमान बोईंग कंपनीचे असून यामध्ये राष्ट्राध्यक्षांसाठी विविध आपत्कालीन परिस्थिती हातळण्याच्या सुविधा आहेत. या विमानामध्ये रेडिएशन शिल्डिंग, अत्याधुनिक क्षेपणास्त्रविरोधी तंत्रज्ञान, विविध संप्रेषण प्रणासी आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष लष्कराच्या संपर्कात राहू शकता. जगात हे विमान कुठेही असले तरी आदेश जारी करता येतो.