Donald Trump's warning to Russia to end war in 10-12 days
Russia Ukriane War : सध्या रशिया आणि युक्रेन युद्धाला १२५० दिवस पूर्ण झाले आहे. या काळात रशियाने युक्रेनवर अनेक तीव्र हल्ले केले आहे. गेल्या काही महिन्यात तर युक्रेनवर सातत्याने रशियाचे हल्ले सुरुच आहेत याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युद्ध संपवण्याचा इशारा दिला आहे. सध्या ट्रम्प स्कॉटलॅंडच्या दौऱ्यावर असून त्यांनी हे विधान केले आहे.
ट्रम्प यांनी रशियाला १०-१२ दिवसांत युद्ध संपवण्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी ७ ते ९ ऑगस्टपर्यंत शांतता चर्चा करुन युक्रेनमध्ये स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी ठोस कारवाईची इशारा पुतिन यांना दिला आहे. यापूर्वी त्यांनी अध्यक्ष पदाच्या सुरुवातील ५० दिवसांचा वेळ दिला होता, परंतु अद्यापही हे युद्ध सुरुच आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आता जास्त वेळ वाट पाहण्यात काहीही अर्थ उरलेला नाही. आम्हाला कोणतीही सकारात्मक प्रगती दिसत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी पुतिनवर दबाव आणत, या युद्धामुळे अनेक लोकांचा बळी जात असून संघर्षा थांबण्याचा इशारा दिला आहे. यासाठी ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्टदरम्यन शांततेच्या मार्गोने चर्चा करण्याचे रशियाला सांगण्यात आले आहे.
डोनल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पुतिनवर टीका करत, पुतिन युद्ध संवण्याबद्दल केवळ बाता मारत असल्याचे म्हटले आहे, रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच आहे. ट्रम्प यांनी पुतिन यांना, हे योग्य नसून मी तुमच्यावर नाराज असल्याचे म्हटले आहे. शिवाय आता पुतिन यांच्याशी चर्चा करण्यात ट्रम्प यांना कोणताही रस नसल्याचे त्यांना म्हटले आहे.
दरम्यान युक्रेनने ट्रम्प यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून पुतिन केवळ शक्ती प्रदर्शन करत असल्याचा आरोप केला आहे. अध्यक्ष झेलेन्स्की यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र अद्याप यावर रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आता हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा अल्टीमेटम यशस्वी होईल का नाही. कारण यापूर्वी अनेकवेळी अमेरिकच्या नेतृत्वाखाली रशिया-युक्रेन युद्धबंदी अयशस्वी ठरली आहे. यामुळे सध्या सर्वांचे पुतिन काय करतील याकडे लक्ष लागले आहे. या युद्धाने हजारो लोकांचा बळी घेतला असून हे युद्ध आता संपले पाहिजे अशी मागणी जागतिक पातळीवर केली जात आहे.