Double-decker bus hit by train in Mexico city, Terrible accident video viral
मेक्सिको : उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. एका मालवाहून ट्रेनने डबलडेकर बसला चिरडले आहे. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हून अधिक लोक जखमी झाली आहे. रेल्वेलाईन आणि मेक्सिकोच्या कॅनेडियन पॅसिफिक कॅन्सस सिटीने या घटनेची पुष्टी केली. या अपघाताचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण मेक्सिको हादरला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी ०८ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीपासून १३० किमी अंतरावर असलेल्या अटलाकोमुल्कोच्या परिसरात हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकांना घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय काही काळासाठी परिसरातील वाहतूकही बंद करण्यात आली होती.
Gen Z समोर नतमस्तक झाले नेपाळचे सरकार! २१ तरुणांच्या मृत्यूनंतर हटवली सोशल मीडियावरील बंदी
अपघाताची चौकशी सुरु
मेक्सिकोच्या नागरी संरक्षण संस्थेने याची माहिती दिली. या घटनेनंतर अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. सध्या हा अपघात का आणि कसा झाला, याची चौकशी सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस हेरादुरा डी प्लाटा लाईनवरुन येते होती. यावेळी अचानक एका मालगाडी ट्रेनने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, बसचे दोन मोठे तुकडे झाले, बस दोन भांगात विभागली गेली. सध्या या अपघातावर बस कंपनीने कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
Dramatic accident in Mexico.
A double-decker bus drove directly into the path of a train.
10 killed, 61 injured… pic.twitter.com/lT6lV5vg1e— the Voice of Republika (@voice_republika) September 9, 2025
सध्या या अपघातावर कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. पण या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये रेल्वे क्रॉसिंगपाशी अनेक गाड्या उभे असल्याचे दिसत आहे, अनेकजण रेल्वे ट्रॅक ओलांडत आहे, याच वेळी बस देखील ट्रॅकवरुन निघालेली होती. पण बस ट्रॅकच्या मध्यभागी पोहोचली आणि याच वेळी एक हाय-स्पीड ट्रेनची बसला धडक बसली.
FAQs (संबंधित प्रश्न)
मेक्सिकोमध्ये कधी आणि कुठे घडला अपघात?
मेक्सिकोची राजधानी मेक्सिकोसिटीपासून १३० किमी अंतरावर असलेल्या अटलाकोमुल्कोच्या परिसरात भीषण अपघात घडला आहे. सोमवारी ०८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी हा अपघात घडला.
अपघाताचे कारण काय?
सध्या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही, या घटनेची चौकशी सुरु आहे. पण या घटनेच्या व्हायरल व्हिडिओवरुन लक्षा येते की, एका मालगाडी ट्रेनने डबल-डेकर बसला जोरदार धडक दिली.