
सिरियाच्या होम्स शहरातील सैन्य अकादमीवर हा ड्रोन हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
सिरिया मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिरियाच्या सैन्या अकादमीवर ( military academy of Syria) ड्रोन (Attack On Syria) झाला आहे. या हल्लात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. होम्स शहरात असलेल्या या सैन्य अकादमीमध्ये पदवीदान समारंभ सुरू होता त्यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
सिरियाचे रक्षामंत्री समारंभातून गेल्यानंतर झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, होम्समधे सुरू असलेल्या सैन्य अकादमीच्या समारंभात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. उत्तीर्ण उमेदरवांचा पदवीदान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या समारंभात सिरियाचे रक्षामंत्रीही हजर होते. ते समारंभातून निघाल्यानंतर थोड्या वेळातच तिथे ड्रोन हल्ला झाला.
हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही घेतली नाही
युद्ध परिस्थितीच्या दोन हात करणाऱ्या सिरियासाठी हा हल्ला मोठा हल्ला मानला जात आहे. अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही आहे. मात्र, सिरियाच्या लष्कराने समर्थित विद्रोही लोकांना जबाबदार ठरवलं आहे.
महिला आणि लहान मुलांची स्थिती गंभीर
सिरियातील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ज्य़ावेळी हा हल्ला झाला त्यावेळी समारंभात मोठ्या प्रमाणावर लोकं होते. यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश होता. हल्लात जखमी झालेल्या महिला आणि मुलाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.