Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dubai Explosion: दुबईतील जेबेल अली औद्योगिक क्षेत्रात 20 मिनिटांत 7 भीषण स्फोट; धुराचे लोट पसरल्याने घबराट, 2 आरोपींना अटक

Dubai Explosion: बुधवारी दुबईचे औद्योगिक केंद्र असलेल्या जेबेल अलीमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. २० मिनिटांच्या कालावधीत झालेल्या सात स्फोटांमुळे सर्वत्र घबराट पसरली. प्रशासनाने दोन जणांना अटक केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 05, 2026 | 02:50 PM
dubai jebel ali explosion 7 blasts arrests marathi news

dubai jebel ali explosion 7 blasts arrests marathi news

Follow Us
Follow Us:
  • २० मिनिटांत ७ स्फोट
  • चित्रफीत बनवल्याप्रकरणी २ जणांना अटक
  • तपास वेगाने सुरू

संयुक्त अरब अमिरातीची (UAE) आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या दुबई (Dubai) शहरातील जेबेल अली औद्योगिक क्षेत्रात बुधवारी, ५ ऑगस्टच्या रात्री एकापाठोपाठ एक शक्तिशाली स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत किमान ७ स्फोटांचे एकापाठोपाठ एक आवाज ऐकू आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटांच्या तीव्रतेमुळे लागलेल्या आगीनंतर काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात उंचावले, जे कित्येक किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेबेल अली परिसरालगत असलेल्या अल फुरजान आणि आसपासच्या निवासी भागांपर्यंत या स्फोटांचे हादरे बसले. अचानक झालेल्या या मोठा आवाजांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. स्फोटानंतर काही वेळातच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि आपत्कालीन सुरक्षा पथकांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने, सुरुवातीच्या तपासात या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नागरिक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही, ही एक मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Deal: कच्च्या तेलाची टंचाई संपणार! अमेरिका-इराण युद्धविरामाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल; 60 दिवसांचा ‘हा’ करार मंजूर

या घटनेनंतर दुबई पोलीस आणि यूएईच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. स्फोटाचे आणि धुराचे व्हिडिओ मोबाईलवर शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. कोणत्याही अनधिकृत किंवा अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवता फक्त सरकारी सूत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे स्पष्ट आवाहन दुबई प्रशासनाकडून स्थानिक रहिवाशांना करण्यात आले आहे.

Multiple explosions and thick black smoke hit Dubai’s Jebel Ali port and industrial zone overnight. UAE authorities frame it as an industrial accident. Iranian outlets instead attribute the blasts to a Houthi missile/drone attack from Yemen. pic.twitter.com/fGXz60NvNj — Clash Report (@clashreport) August 5, 2026

credit – social media and Twitter

स्फोटांचे नेमके कारण काय होते याविषयी अद्याप अधिकृतपणे कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र, नासाच्या (NASA) थर्मल इमेजिंग उपग्रहांच्या चित्रांवरून मिळालेल्या माहितीनुसार, बंदराजवळ असलेल्या इंधन साठवणूक आणि वाहतूक गोदामामध्ये (Fuel Storage Warehouse) ही भीषण आग लागली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर येमेनच्या हुथी बंडखोरांनी हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा काही इराकी प्रसारमाध्यमांनी केला आहे. परंतु अमिरातीच्या प्रशासनाने अशा कोणत्याही परकीय हल्ल्याच्या दाव्याची पुष्टी केलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza: ‘तोपर्यंत सैन्य गाझामधून माघार घेणार नाही’, डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या शांतता योजनेला इस्रायलचा स्पष्ट नकार; नेतान्याहू ठाम

जेबेल अली हे केवळ दुबईतील एक मोठे खरेदी केंद्र नाही, तर ते जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बंदर आणि आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापार क्षेत्र (Jafza) आहे. येथे हजारो आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आणि गोदामे आहेत. पश्चिम आशियातील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीमुळे संयुक्त अरब अमिराती आधीच हाय अलर्टवर आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर वेढा देऊन सुरक्षेचे कडक पाऊल उचलले असून, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा केवळ एक औद्योगिक अपघात होता की यामागे कोणता घातपात होता, याचा कसून तपास अधिकारी करत आहेत.

Web Title: Dubai jebel ali explosion 7 blasts arrests marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Dubai
  • Major Explosion
  • World news

संबंधित बातम्या

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
1

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.