Delhi-NCR Earthquake : राजधानी दिल्लीत मोठा भूकंप; दिल्लीकर साखरझोपेत असतानाच घटना, तीव्रताही जास्त
जकार्ता: जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात बुधवारी (5फेब्रुवारी) तीव्र भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली असून त्याचा केंद्रबिंदू उत्तरी मालुकूच्या किनाऱ्याजवळ असल्याचे भूभौतिक शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 81 किलोमीटवर अंतर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मात्र यामुळे कोणताही संभाव्य धोका नाही. तसेच सुदैवाने कोणताही जीवितहानी झालेली नाही.
याशिवाय, या भूकंपामुळे कोणाताही त्सुनामीचा धोका नसल्याचे भौतिकशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सहसा इंडोनेशियात भूंकप झाल्यावर त्सुनामीचा धोका उद्भवतो, पण यावेळी असा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. इंडोनेशियाच्या आपत्ती नियंत्रण संस्थेने बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. यामुळे लोक भितीने सैरावर पळू लागले. मात्र अद्याप कोणतीही जीवीतहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
‘रिंग ऑफ फायर’
इंडोनेशिया रिंग ऑफ फायर मध्ये स्थित असून, या ठिकाणी पृथ्वीच्या अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. यामुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो. इंडोनेशियाला जगातील सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखले जाते. इंडोनेशियाच्या या भागत वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो. अलिकडेच नेपाळ आमि तिबेटमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. सध्या इंडोनेशियात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असून प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दिलासादायक बाब म्हणजे या 6.1 रिश्टर स्केलच्या धक्क्यामुळे कोणतेही गंभीर नुकसान झालेले नाही.
तीव्रता कशी मोजली जाते?
भूकंपाची तीव्रता आणि वेळ मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राला सिस्मोग्राफ म्हणतात. या उपकरणाच्या मदतीने पृथ्वीच्या आत होणाऱ्या कंपनांचा आलेख तयार केला जातो. याला भूकंपमापक म्हणतात. या आधारावर, भूकंपाच्या लाटांची तीव्रता, भूकंपाचे केंद्र आणि ऊर्जा रिश्टर स्केलद्वारे शोधली जाते.
भूकंप का होतात?
मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत. ज्या फिरत राहतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते आणि गडबड झाल्यानंतर भूकंप होतो. भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे ऊर्जा सोडली जाते. या ठिकाणी भूकंपाची कंपने अधिक तीव्र असतात. कंपनाची वारंवारता जसजशी वाढते तसतसा त्याचा प्रभाव कमी होतो.