Elon Musk got angry with astronaut over Sunita Williams' return from spaceGovernment lists transnational criminal organizations as terrorist entities
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर जवळपास आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत. सध्या नासा त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही जबाबदारी एलॉन मस्क यांच्यावर सोपवली आहे. एलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्स आणि नासा मिळून अंतराळवीरांना परत आणण्यासाठी कार्यरत आहेत. दरम्यान दोन्ही अंतराळवीरांच्या सुरक्षित परतण्याबाबत एलॉन मस्क आणि डॅनिश अंतराळवीर एंड्रियास मोगेन्सेन यांच्यात वाद निर्माण झाल आहे.
काय आहे वाद?
एलॉन मस्क यांनी आरोप केला होता की बायडेन प्रशासनाने सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळवीरांना राजकीय कारणांमुळे ISS वर सोडून दिले आहे. मात्र, मोगेन्सेन यांनी या दाव्याला “खोटे” म्हणत मस्क यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांच्या या विधानानंतर मस्क यांनी मोगेन्सेन यांना “मूर्ख” म्हणत प्रत्युत्तर दिले.मस्क यांनी म्हटले की, स्पेसएक्स या अंतराळवीरांना अनेक महिन्यांपूर्वीच परत आणू शकले असते, परंतु बायडेन प्रशासनाने त्यांच्या या ऑफरला नकार दिला होता.
मोगेन्सेन यांनी प्रत्युत्तरात म्हटले की, “एलॉन, मी तुमचा दीर्घकाळापासून प्रशंसक आहे. तुम्ही स्पेसएक्स आणि टेस्लाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तुम्हाला माहित आहे की, बुच आणि सुनी क्रू-9 सोबत परत येणार आहेत, याची योजना गेल्या सप्टेंबरपासून ठरलेली आहे. आणि आत्ताही, तुम्ही त्यांना परत आणण्यासाठी कोणतेही बचाव मिशन पाठवत नाही.”
You are fully retarded.
SpaceX could have brought them back several months ago.
I OFFERED THIS DIRECTLY to the Biden administration and they refused.
Return WAS pushed back for political reasons.
Idiot.
— Elon Musk (@elonmusk) February 20, 2025
या वादाच्या पार्श्वभूमीवर, मस्क यांनी ISS चे डीकमीशनिंग करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नासा आणि स्पेसएक्स यांच्यातील संबंधांवर परिणाम होऊ शकतो. ISS गेल्या वीस वर्षापासून कक्षेत आहे आणि 2030 मध्ये त्याचे डीकमीशनिंग होणे नियोजित आहे. मस्क यांच्या या विधानामुळे नासा आणि स्पेसएक्स यांच्यातील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण स्पेसएक्स NASA चा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे.
ट्रम्प यांचा हस्तक्षेप
डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. त्यांनी मस्क आणि स्पेसएक्सला अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी दिली होती. नासाने डिसेंबरमध्ये जाहीर केले की, मार्चमध्ये स्पेसएक्सच्या रॉकेटद्वारे अंतराळवीर परत येणार आहेत, आणि ही योजना ट्रम्प यांच्या पदभार ग्रहण करण्यापूर्वीच निश्चित करण्यात आली होती.
विल्यम्स आणि विल्मोर यांनीही स्पष्ट केले आहे की, त्यांना सोडून दिल्यासारखे वाटत नाही आणि ते मार्चमध्ये नियोजित वेळेनुसार परत येणार आहेत. या वादामुळे अंतरिक्ष क्षेत्रातील राजकीय आणि तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे, विशेषतः NASA, स्पेसएक्स आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संदर्भात.