Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Musk: अमेरिकेत रक्तरंजित! खामेनेई विरोधी आंदोलकांविरुद्ध सत्तेचा निर्दय चेहरा; ट्रकने चिरडले, भयावह VIDEO VIRAL

Iran Protest Truck Accident : लॉस एंजेलिसमध्ये एका रॅलीत एका यू-हॉल ट्रकने इराणी निदर्शकांच्या गर्दीवर हल्ला केला. यात तीन जण जखमी झाले आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 12, 2026 | 09:59 AM
los angeles iran protest truck attack trump elon musk starlink internet iran 2026

los angeles iran protest truck attack trump elon musk starlink internet iran 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • लॉस एंजेलिसमध्ये थरार
  • ट्रम्प-मस्क यांची युती
  • आंदोलकांचा रोष

Los Angeles Iran protest truck attack 2026 : इराणमध्ये (Iran) सुरू असलेल्या क्रांतीची धग आता सातासमुद्रापार अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. लॉस एंजेलिसमधील वेस्टवुड परिसरात रविवारी एका भीषण घटनेने खळबळ उडाली. इराणमधील स्वातंत्र्याच्या मागणीसाठी जमलेल्या शेकडो आंदोलकांच्या गर्दीत एका यू-हॉल (U-Haul) ट्रकने शिरकाव केला. या हल्ल्यात अनेक जण चिरडले गेल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र सुदैवाने तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

वेस्टवुडमधील तो भीषण प्रसंग

शेकडो इराणी-अमेरिकन नागरिक हातात राष्ट्रध्वज घेऊन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. अचानक एक भरधाव ट्रक गर्दीच्या दिशेने आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरने मुद्दाम आंदोलकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या ट्रकवर एक बॅनर होता ज्यावर “मुल्ला नकोत, १९५३ ची पुनरावृत्ती नको” असा राजकीय संदेश लिहिला होता. ट्रक धडकल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकला घेराव घातला, खिडक्या फोडल्या आणि ड्रायव्हरला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेतले, अन्यथा जमावाकडून त्याची मॉब लिंचिंग होण्याची शक्यता होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

इराणमध्ये क्रांतीसाठी ‘मस्क’ची मदत: ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

या घटनेनंतर काही वेळातच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. इराण सरकारने आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी संपूर्ण देशात इंटरनेट बंद केले आहे. यावर तोडगा म्हणून ट्रम्प यांनी अब्जाधीश एलन मस्क यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. ट्रम्प म्हणाले, “आम्ही एलन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटचा वापर करून इराणमधील जनतेला जगाशी जोडू शकतो. हुकूमशाही राजवट आता लोकांचा आवाज दाबू शकणार नाही.” जर मस्क यांनी ‘स्टारलिंक’ इराणमध्ये सक्रिय केले, तर खामेनी सरकारला निदर्शने चिरडणे अशक्य होईल.

WATCH 🔴 An enraged crowd dragged the truck driver from his cab and destroyed the vehicle after it plowed into Iranian demonstrators in Los Angeles, California. pic.twitter.com/1CPyr0sY1p — Open Source Intel (@Osint613) January 12, 2026

credit : social media and Twitter

इराणमधील रक्ताळलेला संघर्ष

मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, गेल्या दोन आठवड्यांत इराणमध्ये ५३० हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. इराण सरकारने केवळ  इंटरनेटच बंद केले नाही, तर आंदोलकांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये झालेला हा ट्रक हल्ला इराणमधील अंतर्गत संघर्षाचे पडसाद जगभरात उमटत असल्याचे प्रतीक आहे. लॉस एंजेलिस पोलिसांनी याला ‘हेट क्राईम’ (Hate Crime) मानून तपास सुरू केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Conflict : इराणची ‘डेथ वॉरंट’ घोषणा; अमेरिका आणि इस्रायल ‘हिट लिस्ट’वर; मध्यपूर्वेत युद्धजन्य हालचालींना वेग

इंटरनेट पुनर्संचयित करण्याचे महत्त्व

इराणमधील निदर्शनांना संघटित करण्यासाठी इंटरनेट हे सर्वात मोठे शस्त्र आहे. एलन मस्क यांची ‘स्टारलिंक’ सेवा कोणत्याही स्थानिक केबल किंवा टॉवरवर अवलंबून नसते. थेट अंतराळातून येणाऱ्या सिग्नलमुळे इराण सरकारला हे इंटरनेट ब्लॉक करणे कठीण जाईल. ट्रम्प आणि मस्क यांची ही ‘डिजिटल स्ट्राईक’ इराणमधील धार्मिक राजवट उलथवून टाकण्यासाठी गेमचेंजर ठरू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लॉस एंजेलिसमध्ये नेमके काय घडले?

    Ans: एका ट्रक चालकाने मुद्दाम इराण सरकारचा निषेध करणाऱ्या आंदोलकांच्या गर्दीत ट्रक घुसवला, ज्यामध्ये ३ जण जखमी झाले आहेत.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प एलन मस्क यांची मदत का घेत आहेत?

    Ans: इराण सरकारने देशात इंटरनेट बंद केले आहे. एलन मस्क यांच्या 'स्टारलिंक' द्वारे सॅटेलाइट इंटरनेट पुरवून आंदोलकांना मदत करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे.

  • Que: ट्रक चालकाचे उद्दिष्ट काय होते?

    Ans: ट्रकवर असलेल्या राजकीय बॅनरवरून असे दिसून येते की, हा हल्ला वैयक्तिक किंवा राजकीय द्वेषातून केला गेला असावा. पोलीस सध्या याचा तपास करत आहेत.

Web Title: Los angeles iran protest truck attack trump elon musk starlink internet iran 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elon musk
  • iran
  • third world war

संबंधित बातम्या

Ibrahim Azizi : ‘आम्हाला युद्धाशिवाय काहीच दिसत नाही…’ कूटनीती संपली; इराण संसदेचे वरिष्ठ नेते अझीझींचे सूचक विधान
1

Ibrahim Azizi : ‘आम्हाला युद्धाशिवाय काहीच दिसत नाही…’ कूटनीती संपली; इराण संसदेचे वरिष्ठ नेते अझीझींचे सूचक विधान

Career Tips : चांगला Job मिळत नाहीये? Elon Musk चा ‘ही’ Advise नक्की फॉलो करा
2

Career Tips : चांगला Job मिळत नाहीये? Elon Musk चा ‘ही’ Advise नक्की फॉलो करा

Middle East Tension : इराणमध्ये क्रांती की कब्जा? लष्करी जनरलच्या हाती देशाची सूत्रे; अमेरिकेसोबतच्या शांतता करारावर फिरवले पाणी
3

Middle East Tension : इराणमध्ये क्रांती की कब्जा? लष्करी जनरलच्या हाती देशाची सूत्रे; अमेरिकेसोबतच्या शांतता करारावर फिरवले पाणी

War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL
4

War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.