
Iran Protest
मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा दलांच्या अमानुष गोळीबारात ५३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र मृतदेह अस्थाव्यस्थ पडले आहे. रुग्णालयातही मृतदेह ठेवण्यासा जागा नाही. मानवाधिका संघटनांच्या मचे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याच वेळी अनेक आंदोलकांना अटकही करण्यात आली आहे. आतापर्यंत १० हजाराहून अधिक लोकांना सुरक्षा दलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
तसेच याच वेळी इराणमध्ये इंटरनेट सेवाही बंदी करण्यात आल्या आहेत. ८ जानेवारी २०२६ पासून संपूर्ण देशभरात इंटनेट आणि फोन सुविधांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत घडणाऱ्या घटनांबाबत स्पष्ट माहिती मिळणे कठीण झाले आहे. परंतु सोशल मीडियावर सुरक्षा दलांच्या आंदोलकांवरील गोळीबाराचे काही व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हे व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझाश्कियान यांनी इराणमधील हिंसक परिस्थितीसाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. पेझाश्कियान यांनी इस्रायल आणि अमेरिकेवर अराजकता पसरवल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने दहशतवाद्यांना फूस लावली असल्याचे इराणच्या सरकारचे म्हणणे आहे. इराणच्या संसदेने म्हटले आहे की, जर अमेरिकेने त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे सैन्य अमेरिकन तळ आणि इस्रायलला उद्ध्वस्त करुन टाकेल.
Today, thousands of Iranians, British , Ukrainians, and Israelis rallied in London to be the voice of the Iranian people.
In Iran, the internet has been cut off to facilitate the mass murder of protesters who are calling for the return of the King, #RezaPahlavi pic.twitter.com/TjmYSinYeo — نیکی (@otherwybie) January 12, 2026
तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणमधील आंदोलकांना उघडपणे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या जनतेला स्वातंत्र हवे आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी अमेरिका तयार आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी इराणमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष असल्याचे म्हटले आहे.
Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला
Ans: सध्या इराणच्या जनते खामेनेई सरकाविरोधात तीव्र आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या कठोर धोरणांविरोधा, वाढत्या महागाईविरोधात लोक रस्त्यांवर उतरले आहे. या आंदोलकांना दाबण्यासाठी सरकार लष्करी बळाचा वापर करत आहे. यामुळे जनतेत आक्रोश वाढत आहे. तसेच सुरक्षा दलांकडून भीषण गोळीबार केला जात आहे.
Ans: इराणमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात आतापर्यंत ५३८ लोकांचा बळी गेला आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या आंदोलकांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या जनतेला स्वातंत्र हवे आहे आणि त्यासाठी अमेरिका त्यांच्या पाठीशी आहे.