'Elon Musk is the father of my child'; Influencer's sensational claim; Know what Tesla CEO said
वॉशिंग्टन: अमेरिकन अब्जाधीश आणि टेस्ला कंपनीचे CEO एलॉन मस्क नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी आणि कारवायांसाठी चर्चेत असतात. सध्या ते भारताची फंडिंग रद्द केल्याने चर्चेत तर आहेतच पण आणखी एका गोष्टीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी ते कोणत्याही बिझनेससाठी नाही, तर त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आले आहेत. कंजर्वेटिव्ह इंफ्लुएन्सर एशले सेंट क्लेयरने मस्कवर आरोप केला आहे की एलॉन मस्क तिच्या पाच महिन्यांच्या बाळाचे वडील आहेत.
एशले सेंट क्लेयरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर 15 फेब्रुवारी, 2025 रोजी पोस्ट करत दावा केला, “एलॉन मस्क माझ्या मुलाचे वडील आहेत. मी माझ्या बाळाचे या जगात स्वागत करते.” या दाव्यानंतर एलॉन मस्कने यांनी या पोस्टला प्रतिसाद देत यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी फक्त “वाह” असे उत्तर दिले.
Alea Iacta Est pic.twitter.com/gvVaFNTGqn
— Ashley St. Clair (@stclairashley) February 15, 2025
बाळाच्या सुरक्षेसाठी माहिती गुप्त ठेवली
सेंट क्लेयरने पुढे स्पष्ट केले की, “माझ्या बाळाच्या सुरक्षेसाठी ही माहिती मी गुप्त ठेवली होती. मात्र, जेव्हा मला समजले की टॅब्लॉयड्स ही बातमी लवकरच फोडणार आहेत, तेव्हा मी स्वतःच ती सर्वांना सांगण्याचा निर्णय घेतला.” तिने सांगितले की, माध्यमांच्या हस्तक्षेपामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला.
तिने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “एलॉन मस्कच्या प्रतिक्रियेनंतर मी त्यांना थेट संवाद साधण्यासाठी आमंत्रण दिले, पण त्यांनी अजूनही कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. आम्ही अनेक दिवसांपासून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्यांनी आमच्या कोणत्याही प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही.”
एलॉन मस्कवरील इतर आरोप
सेंट क्लेयरने एलॉन मस्कवर आरोप केला की, “मस्क यांनी मला आणखी मुले जन्माला घालण्याची विनंती केली होती. मात्र, आता ते थेट संवाद साधण्याऐवजी अशा वादांमध्ये अडकले आहेत.” सेंट क्लेयरने पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट काही काळाने डिलीट केली. या सर्व घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चेचा भडका उडाला आहे.
मस्क यांंच्या सध्या प्रतिक्रियेने लोकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. सेंट क्लेयरच्या दाव्यांवर मस्क अधिकृतपणे प्रतिक्रिया देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या ही पोस्ट डिलीट झाली असून यापोस्टवर एलॉन मस्क यांच्या वाह एवढ्याच प्रतिसादाशिवाय दुसरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इन्फ्लुएन्सरच्या दाव्याने सर्वत्र खळूळ उडाली आहे.