
Denmark PM Slams Trump's on threatening Greenland
काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी
माध्यमांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांना अमेरिकेने नाटो सदस्याविरुद्ध बळाचा वापर केल्यास काय परिणाम होतील असे विचारण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, ग्रीनलँडवर अमेरिकेचा दबाव आम्हाला स्वीकार्ह नाही. त्यांनी स्पष्ट केले की ग्रीनलँड हा अमेरिकेचा भाग होणार नाही, भविष्यात कधीही अमेरिकेशी जोडला जाणार नाही.
मेटे यांनी हेही स्पष्ट केले की, ग्रीनलँडचे भविष्य हे डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नागरिकांद्वारे निश्चित केले जाईल. यामुळे ट्रम्प यांनी सीमांचा आदर करावा अन्यथा यामुळे नाटोचा विनाश होईल असेही त्या म्हणाल्या. मेटे फ्रेडरिकसन यांच्या या भूमिकेला अनेक युरोपीय देशांकडूनही पाठिंबा मिळाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील कारवाईच्या दुसऱ्या दिवशी ग्रीनलँडवर खळबळजनक विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेला ग्रीनलँडची गरज आहे आणि गरज पडल्यास त्याविरोधात कारवाई देखील केली जाईल. यावर प्रतिक्रिया देत डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचा अधिकार नसून त्यावर नियंत्रणाचा प्रयत्न केल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असे मेटे फ्रेडरिकन यांनी म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी ट्रम्प यांच्या लिस्टमध्ये आता, क्यूबा आणि कोलंबियाचे नावही सामील आहे. ट्रम्प यांनी या देशांवरही वर्चस्वाची घोषणा केली आहे. त्यांनी परराष्ट्र धोरणात नवी नीती अवलंबवली आहे. डोनरो ड्रॉक्ट्रिन नीतीचा वापर करत त्यांनी या देशांवर अमेरिकेच्या वर्चस्वाचा दावा केला आहे. याचा हेतू अमेरिकेला या प्रदेशांमधून रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव कमी करायचा आहे. सध्या यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
Ans: डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील विधानाला तीव्र विरोध केला आहे. तलेत ग्रीनलँड हे तेथील लोकांचे आणि डेन्मार्कचे असून ते अमेरिकेत सहभागी होणार नाही. असे झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी म्हटले आहे.
Ans: नाटो बाबत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी अमेरिकेने नाटोच्या सदस्य देशावर बळाचा वापर केला सर्व काही संपेल असा इशारा दिला आहे.
Ans: ग्रीनलँड हा भौगोलिक दृष्ट्या समृद्ध देश असल्याने अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
Ans: ग्रीनलँड वादावर युरोपीय देशांनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांना पाठिंबा देत सीमांचा आदर ट्रम्प यांनी ठेवला पाहिजे असे म्हटले आहे.