Elon Musk slams Ukrainian President Zelensky for fighting with donald trump
कीव: सध्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तणाव सुरु आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेला सहमती दर्शवली असून लवकरच युक्रेन अमेरिकेसोबत शांतता चर्चा होईल. याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी युक्रेनबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी झेलेन्स्कींना इशारा दिला आहे की, त्यांची स्टारलिंक प्रणाली बंद करण्यात येईल. यामुळे युक्रेनची संपूर्ण आघाडी कोसळेल.
एलॉन मस्क यांचे हे विधान अशा वेळी आले जेव्हा रशिया-यूक्रेन संघर्ष तीव्र झाला आहे. मस्क यांचे हे विधान पाश्चात्य देश आणि यूक्रेनियन सरकारसाठी धोकादायक मानले जात आहे. कारण स्टारलिंक प्रणाली बंद झाल्यास लष्करी संवादात अडथळा येईल. एलॉन मस्क यांचे हे विधान डोनाल्ड ट्रम्पसोबत झालेल्या झेलेन्स्की यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आले आहे.
काय म्हणाले मस्क?
एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, मी पुतिन यांना यूक्रेनवर समारोसमोर प्रत्यक्ष लढाईचे आव्हान दिले आहे, यूक्रेनसाठी स्टारलिंक प्रणाली लष्करी संवादासाठी कणा आहे. स्टारलिंक बंद झाल्यास त्यांना लष्करी संवादात अडथळा निर्माण होईल आणि संपूर्ण आघाडी कोसळेल. मस्क यांनी म्हटले आहे की, मला अशा वर्षानुवर्षे सुरु असलेल्या नरसंहारामुले चीड आली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, झेलेन्स्की विनाकरण युद्ध ताणत आहेत. हे युद्ध भ्रष्टाचाराचा कधीही न संपणारा खेळ बनत चालले आहे.
स्टारलिंक यूक्रेनसाठी महत्त्वाचे का?
स्टारलिंक ही एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीद्वारे चालवली जाणारी इंटरनेट प्रणाली आहे. स्टारलिंकमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जलद आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्शन प्राप्त होते. याचा यूक्रेनच्या लष्कराला युद्धाच्या काळात संवाद साधण्यासाठी फोटा फायदा होतो. यापूर्वी फेब्रवारी 2022 मद्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, युक्रेनच्या फिक्स्ड-लाइन आणि मोबाईव नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे स्टारलिंक यूक्रेनियन सैन्य आणि सरकारला मजबूत संप्रेषण नेटवर्क प्रदान करते.
यामुळे एलॉन मस्क यांनी यूक्रेनमधील स्टारलिंक सेवा बंद केल्यास यूक्रेनच्या लष्करी संवादावर गंभीर परिणाम होईल. ड्रोन हल्ले आणि सायबर ऑपरेशन्सची क्षमता कमी होईल आणि याचा रशियाला युद्धभूमीत फायदा होईल. यूक्रेनची संपूर्ण लष्करी दळणवळण व्यवस्था ढासळेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनचे पुन्हा पाकिस्तानवर उपकार; दया दाखवत घेतला मोठा ‘हा’ निर्णय