
Ukraine In Exchange for Venezuela, Russia has A Secret Deal with the United States
दरम्यान याबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. दावा केला जात आहे की, रशियाच्या मादुरो यांच्या अटकेनंतरही शांता राहण्यामागे अमेरिका आणि रशियाचा जुना गुप्त करार आहे. ज्याचा संबंध युक्रेनशी असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टेलिग्राफने दिलेल्या अहवालानुसलार, युक्रेन रशिया युद्धाच्या तीन वर्षापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेसोबत व्लादिमिर पुतिन यांनी एक महत्त्वाचा करार केला होता. या करारानुसार, व्हेनेझुएलाच्या बदल्यात रशियाला एक देश दिला जाणार होता.
द टेलिग्राफच्या अहवालानुसार, 2019 च्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील रशियन व्यवहार सल्लागार यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाने व्हेनेझुएला सोडण्याच्या बदल्यात युक्रेनची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात आले होते. परंतु सध्या मादुरो यांच्या अटकेनंतर हा दावा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामुळे रशियाचे मौनामागे नेमकं रहस्य काय आहे? यावर जोरदार चर्चा सुरु आहे.
अमेरिकेने मादुरो यांनी अटक केल्यानंतर रशियाने केवळ एक निवदेन जारी केले होते. त्यांनी केवळ अमेरिकेच्या कारवाईला तीव्र विरोध केला होता. तसेच मादुरोंच्या सुटकेची मागणी केली होती. रशियाकडून व्यापक स्तरावर विरोध झाला नाही, ना ही व्हेनेझुएलाला कोणताही सुरक्षा पाठिंबा मिळाला. रशियाने अमेरिकेच्या कारवाईला बेकायदेशीर म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांचे पाऊल चुकीचे असल्याचेही विधान केले आहे. परंतु ही विधाने व्हेनेझुएलाला पाठिंबा देण्यासाठी पुरेशी नाहीत.
द टेलिग्राफच्या अहवालानुसार, फियोना हिल यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना ही अमेरिकेच्या डोनरो धोरणाशी केली आहे. Donroe Doctrine हे अमेरिकेचे नवे परराष्ट्र धोरण आहे. याअंतर्गत अमेरिका पश्चिम गोलार्धात आपले वर्चस्व प्रस्थापित करुन चीन आणि रशियाचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने म्हटले आहे की, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला या भागातील कोणत्याही देशाकडून धोका निर्माण झाल्यास त्यांचावर लष्करी कारवाई करण्यात येईल आणि त्या देशाचे सरकार उलथवून टाकले जाईल.
Ans: द टेलिग्राफच्या अहवालानुसार, 2019 च्या ट्रम्प यांच्या कार्यकाळात रशियाने व्हेनेझुएला सोडण्याच्या बदल्यात युक्रेनची मागणी केली होती.
Ans: Donroe Doctrine हे अमेरिकेचे नवे परराष्ट्र धोरण आहे. याअंतर्गत अमेरिका पश्चिम गोलार्धात आपले वर्चस्व प्रस्थापित करुन चीन आणि रशियाचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.