Emmanuel Macron slapped by his wife video goes viral
पॅरिस: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांच्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये एक महिला इमॅन्युएल मॅक्रों यांना कानाखाली मारताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इमॅन्यूएल मॅक्रों यांना त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांनी थप्पड मारली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयाने या व्हिडिओला जास्त महत्व दिले देण्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष व्हिएतनाममध्ये त्यांच्या विमानातून उतरत असताना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रों यांचे ब्रिजिटने यांच्याशी लग्न झाले. ब्रिजिट मॅक्रों अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोंपेक्षा २५ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यांचे वय ७२ आहे. सध्या ब्रिजिट फ्रान्सच्या पहिल्या महिला पदावर आहेत.त्यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला आहे. तसेच त्यांनी आपले शिक्षण साहित्यात पूर्ण केले आहे.
ब्रिजिट यांचे पहिले लग्न आंद्रेशी झाले होते. आंद्रे आणि ब्रिजिट यांनी तीन मुले आहेत. लग्नानंतर ब्रिजिटन यांनी शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरु केले. या ठिकाणी त्या इमॅन्युएल मॅक्रों यांना भेटल्या.
त्यावेळी इमॅन्युएल मॅक्रों १५ वर्षांचे होते. ते शिक्षिका ब्रिजिटच्या प्रेमात पडले. त्यांनी ब्रिजिटला याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना राग आला, पण नंतर त्याही इमॅन्युएलच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर दोघांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. जवळपास 10 वर्षे दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होत्या. १० वर्षाच्या प्रेमानंतर इमॅन्युएल आणि ब्रिजिटने २००७ मध्ये लग्न केले. २०१७ मध्ये इमॅन्युएल यांनी फ्रान्सच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. यानंतर इमॅन्युएलने ब्रिजिटसाठी फर्स्ट लेडीचे पद निर्माण केले.
❗️ Macron’s wife viciously SMACKS him in face pic.twitter.com/2zSalRFYLu
— RT (@RT_com) May 26, 2025
ब्रिजिट यांनी इमॅन्युएल मॅक्रों यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या नवऱ्याने अज्ञातवास स्वीकारला.याचा खुलासा २०२१ मध्ये ब्रिजिटच्या मुलीने केला. ब्रिजिटच्या मुलीच्या म्हणण्यांनुसार, ब्रिजिटची इमॅन्युएलशी ओळख तिनेच करुन दिली होती. त्यावेळी इमॅन्युएल आणि ब्रिजिटची मुलगी मित्र होते.
दरम्यान इमॅन्युएल मॅक्रोंचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. परंतु अद्याप यावर अध्यक्षांनी काहीह प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.