Erase sad memories with this psychology method
वेदनादायक आठवणींपासून सुटका करण्यासाठी स्वीकार आणि व्यक्त होणे सर्वात महत्वाचे.
ध्यान, योग, लेखन आणि नवीन छंद मनाला संतुलित करून पुढे जाण्यास मदत करतात.
जर वेदना खूप वाढल्या तर व्यावसायिक मदत घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
Erase bad memories psychology : आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात, जे काळाच्या ओघात विसरणे जवळजवळ अशक्य ठरते. काही आठवणी सुखद असतात, तर काही खोलवर जखमा देऊन जातात. प्रिय व्यक्ती दुरावते, नातं तुटतं किंवा भूतकाळातील एखादा प्रसंग मनात कायमचा कोरला जातो. अशा आठवणींनी माणूस एकटा पडतो, तुटतो, आणि पुढे जाणे अवघड होते. पण खरं सांगायचं तर या वेदनादायक आठवणींपासून सुटका होणं अशक्य नाही. योग्य मार्ग अवलंबला तर जीवन पुन्हा सुंदर बनवता येतं.
आठवणींपासून पळ काढणं किंवा त्या दाबून ठेवणं हा उपाय नसतो. त्या मान्य करणं आणि स्वीकारणं हीच खरी सुरुवात आहे. स्वतःला हे पटवून द्या की जे घडलं ते भूतकाळातलं आहे आणि तुम्ही त्यातून शिकून पुढे जाणार आहात. स्वीकारल्याने मन हलकं होतं आणि आत्मविश्वास वाढतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KP Sharma Oli : भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य
मनात दाबून ठेवलेल्या भावना अधिक वेदना देतात. त्या बोलून दाखवा कधी आपल्या विश्वासू मित्रांशी, कधी कुटुंबीयांशी, किंवा समुपदेशकाशी. संवादातून मन मोकळं होतं, हृदय हलकं होतं आणि आपण एकटे नाही आहोत याची जाणीव होते.
डायरी लिहिणं, कविता रचणं, चित्रकला करणं किंवा कोणत्याही स्वरूपात भावना व्यक्त करणं हा खूप प्रभावी उपाय आहे. शब्दांमध्ये किंवा रंगांमध्ये व्यक्त झालेलं दु:ख हळूहळू विरघळतं. लेखनाला “मनाचा उपचार” म्हणतात, कारण ते अंतर्मनातील ओझं हलकं करतं.
ध्यान आणि योग हे केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही रामबाण आहेत. ते मनाला वर्तमानात जगायला शिकवतात. भूतकाळातील आठवणींना थोडं दूर ठेवून तुम्हाला आत्ताच्या क्षणात जगायला मदत करतात. दिवसातून काही मिनिटं ध्यान किंवा प्राणायामाचा सराव केल्याने मानसिक संतुलन मिळतं.
जेव्हा आपण रिकामे असतो तेव्हा आठवणी डोकं वर काढतात. म्हणूनच स्वतःला व्यस्त ठेवा. नवीन छंद जोपासा वाचन, लेखन, प्रवास, संगीत, पाककला, बागकाम… काहीही जे तुम्हाला आनंद देईल. नवीन अनुभवात बुडून गेल्यावर जुन्या जखमा हळूहळू भरू लागतात.
शारीरिक आरोग्याचाही मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम यामुळे मनही सकारात्मक राहते. जेव्हा शरीर निरोगी असतं, तेव्हा मनही दुःख पचवायला अधिक सक्षम होतं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Middle East : आखाती देश आक्रमण करणार… कतारने दिला इशारा, इस्रायलला मिळणार चोख प्रत्युत्तर
जर आठवणींचं ओझं खूपच जड झालं, तर तज्ज्ञांची मदत घ्या. मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक किंवा थेरपिस्ट तुम्हाला योग्य दिशा देऊ शकतात. यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. उलट, हेच पाऊल तुम्हाला पूर्णपणे बरे होण्यास मदत करेल. आठवणी कधीच पूर्णपणे नाहीशा होत नाहीत, पण त्या तुम्हाला त्रास देणं थांबवू शकतात. सत्य स्वीकारा, भावना व्यक्त करा, मनाला सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा आणि आवश्यक असेल तर व्यावसायिक मदत घ्या. जीवन सुंदर आहे, फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.