Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Turkey Parliament बनली ‘रणांगण’! Erdogan यांच्या खासदाराला विरोधकांनी भर सभागृहात बदडले; अर्थसंकल्पावरून 10 मिनिटे तुंबळ हाणामारी

Turkey संसदेतून धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. अर्थसंकल्पीय मतदानादरम्यान, खासदारांनी आपला संयम गमावला आणि ते हाणामारी करू लागले. 2026 च्या अर्थसंकल्पावरील मतदानापूर्वी तुर्की ग्रँड नॅशनल असेंब्ली मध्ये तणाव वाढला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 22, 2025 | 02:18 PM
Erdogan's MP heckled by opposition in parliament 10-minute scuffle over budget

Erdogan's MP heckled by opposition in parliament 10-minute scuffle over budget

Follow Us
Close
Follow Us:
  •  तुर्की संसदेत २०२६ च्या अर्थसंकल्पावरील मतदानापूर्वी सत्ताधारी एके पक्ष आणि विरोधी सीएचपी (CHP) पक्षाच्या खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
  • मुस्तफा वरांक आणि मुरात अमीर यांच्यातील वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ स्थगित करावे लागले.
  •  या राड्यानंतरही एर्दोगान सरकारने ३२० विरुद्ध २४९ मतांनी २०२६ चा अर्थसंकल्प आणि २०२४ चा अंतिम लेखा कायदा मंजूर करून घेतला.

Turkey parliament fight December 2025 video : जगातील लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेतून पुन्हा एकदा धक्कादायक आणि लज्जास्पद दृश्ये समोर आली आहेत. तुर्की संसदेत (Grand National Assembly) २०२६ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार एकमेकांशी भिडले. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, भर सभागृहात खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) होत असून, जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमका वाद कशामुळे झाला?

तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या ‘एके’ (AK) पक्षाचे खासदार आणि माजी मंत्री मुस्तफा वरांक हे अर्थसंकल्पावर आपले मत मांडण्यासाठी उभे राहिले होते. यावेळी विरोधी पक्ष असलेल्या सीएचपी (CHP) चे उपाध्यक्ष मुरात अमीर आणि इल्हामी आयगुन त्यांच्याकडे गेले. अर्थसंकल्पातील काही तरतुदींवरून त्यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली. मुरात अमीर आणि वरांक यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, त्यांच्यात थेट धक्काबुक्की सुरू झाली आणि अवघ्या काही सेकंदात संपूर्ण सभागृह रणांगणात रूपांतरित झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terrorist Attacks : नवीन वर्षाच्या जल्लोषावर ISISचे सावट; जागतिक स्तरावर हल्ल्यांचा मोठा कट, ‘AI’ चा वापर करून दहशतवादी देणार चकवा

१० मिनिटांचा थरार अन् खासदारांची सुरक्षा भिंत

संसदेच्या महासभेत जवळपास १० मिनिटे हा गोंधळ सुरू होता. दोन्ही बाजूंचे डझनभर खासदार एकमेकांवर धावून गेले. धक्काबुक्कीत काही खासदार खाली पडले, तर काहींना किरकोळ दुखापतही झाली. या राड्यातून आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी खासदारांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, एमएचपी (MHP) पक्षाच्या खासदारांनी आपले सरचिटणीस देवलेट बहसेली यांच्याभोवती मानवी भिंत उभारली होती, जेणेकरून त्यांना कोणतीही इजा होऊ नये. तणाव वाढल्याने संसदेचे अध्यक्ष नुमान कुर्तुलमुस यांनी कामकाज १० मिनिटांसाठी थांबवले.

A fight broke out between AK Party and CHP MPs during budget discussions in the Turkish Grand National Assembly. pic.twitter.com/fQ4dJ7dJdv — The Daily News (@DailyNewsJustIn) December 21, 2025

credit : social media and Twitter

विरोधकांचा आरोप: “हा जनतेचा खिसा कापण्याचा अर्थसंकल्प”

विरोधी पक्षाने २०२६ च्या अर्थसंकल्पावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तुर्कीमध्ये सध्या महागाईने उच्चांक गाठला असून, सरकारने मांडलेला १८.९ ट्रिलियन लिराचा हा अर्थसंकल्प जनतेला अधिक गरिबीत ढकलणारा असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. २.७ ट्रिलियन लिराची तूट आणि व्याजावरील वाढता खर्च यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. याच रागातून संसदेत ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट

गोंधळातच अर्थसंकल्प मंजूर

हंगामी स्थगितीनंतर कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा तणाव कायम होता. मात्र, राष्ट्रपती एर्दोगान यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याने सरकारने कोणत्याही चर्चेविना विधेयक मतदानाला टाकले. अखेर, ३२० विरुद्ध २४९ मतांनी २०२६ चा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यासोबतच २०२४ चा अंतिम लेखा कायदाही मंजूर झाला. या विजयानंतर सत्ताधारी पक्षाने जल्लोष केला असला, तरी संसदेतील या कृत्यामुळे तुर्कीच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुर्की संसदेत हाणामारी कोणत्या कारणावरून झाली?

    Ans: २०२६ च्या केंद्र सरकारी अर्थसंकल्पावरील (Budget 2026) मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

  • Que: या हाणामारीत कोणते मुख्य नेते सामील होते?

    Ans: सत्ताधारी एके पक्षाचे खासदार मुस्तफा वरांक आणि विरोधी सीएचपी पक्षाचे उपाध्यक्ष मुरात अमीर यांच्यात मुख्य संघर्ष झाला.

  • Que: गदारोळानंतर अर्थसंकल्प मंजूर झाला का?

    Ans: होय, संसदेत ३२० खासदारांनी अर्थसंकल्पाच्या बाजूने मतदान केल्यामुळे २०२६ चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

Web Title: Erdogans mp heckled by opposition in parliament 10 minute scuffle over budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Parliament News
  • Turkey
  • viral video

संबंधित बातम्या

बाप-लेकीची झाली शेवटची भेट! शाळेत सोडायला गेले अन् काळाने केला घाला, हृदयद्रावक VIDEO VIRAL
1

बाप-लेकीची झाली शेवटची भेट! शाळेत सोडायला गेले अन् काळाने केला घाला, हृदयद्रावक VIDEO VIRAL

कौन हे ये लोग…! क्रिसमससाठी तरुणीने बनवली हटके हेअरस्टाईल; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
2

कौन हे ये लोग…! क्रिसमससाठी तरुणीने बनवली हटके हेअरस्टाईल; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

ऑटो नाही OYOचं! धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
3

ऑटो नाही OYOचं! धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

Israel Military : नेतान्याहू घेणार सूड! भूमध्य समुद्रात एर्दोगान यांची नाकेबंदी करण्यासाठी इस्रायलचा ‘मास्टरप्लॅन’
4

Israel Military : नेतान्याहू घेणार सूड! भूमध्य समुद्रात एर्दोगान यांची नाकेबंदी करण्यासाठी इस्रायलचा ‘मास्टरप्लॅन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.