Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ देशाने घेतला मोठा निर्णय; 164 नागरिकांना बोलावले परत, नेमकं कारण काय?

पूर्व आफ्रिकेतील देश इथियोपियाने आपल्या 164 नागरिकांना लेबनॉनची राजधानी बेरुतमधून परत बोलवले आहे. हा निर्णय युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. इथियोपियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधित माहिती दिली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 15, 2025 | 02:20 PM
सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू

सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

अदीस अबाबा: पूर्व आफ्रिकेतील देश इथियोपियाने सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या 164 नागरिकांना लेबनॉनची राजधानी बेरुतमधून परत बोलवले आहे. इथियोपियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. परराष्ट् मंत्रालयाने सांगितले की, या नागरिकांचा अदीस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आले. परत आलेल्या नागरिकांचे स्वागत इथियोपियाच्या शरणार्थी आणि पुनर्वसन सेवांचे महासंचालक तेइबा हसन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी साततत्याने प्रयत्न सुरु

पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, इथियोपिया सरकार विविध देशांमध्ये सुरक्षेच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या आपल्या नागरिकांना स्वदेशात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी यावर भर दिला आहे की, सरकार शरणार्थी आणि पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून परदेशात कठीण परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्येही उथियोपियाने लेबनॉनमधून आपल्या नागरिकांना परत आणले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलॅंडचे स्वप्न साकार होणार; रिपब्लिकन कायदेकर्त्यांनी दाखवला हिरवा झेंडा

इथियोपिया आणि सोमालियात द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर

तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले की हा निर्णय परदेशातील आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) अहवालानुसार, इथियोपियन लोक लेबनानमधील मोठ्या स्थलांतरित समूहांपैकी एक आहेत.

दरम्यान, इथियोपिया आणि सोमालिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला आहे. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद आणि सोमालियाचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मद यांच्यात अदीस अबाबा येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दोन्ही देशांनी आपापसातील सहकार्य वाढवून क्षेत्रीय स्थिरतेसाठी मजबूत सहकार्याची गरज व्यक्त केली.

दोन्ही देशांतील संबंध अधिक सुदृढ होण्याची अपेक्षा

दोन्ही नेत्यांनी परस्पर विश्वास, आदर आणि सामंजस्य यांवर आधारित संबंध सुधारण्यावर भर दिला. इथियोपियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, क्षेत्रीय स्थिरतेसाठी समन्वय बळकट करण्याची आणि सामाईक प्रगतीसाठी काम करण्याची ग्वाही दोन्ही देशांनी दिली. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक सुदृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकीकडे परदेशातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न तर दुसरीकडे क्षेत्रीय संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न, या दोन्ही बाबी इथियोपियाच्या प्रगतीशील धोरणांचे दर्शन घडवतात. अशा निर्णयांमुळे देशातील सामाजिक आणि राजकीय स्थिरतेला हातभार लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर जयघोष; महाकुंभाबाबत ‘या’ इस्लामिक देशांनी केलं सर्वाधिक सर्च

Web Title: Ethiopia repatriates 164 citizens from lebanon in the wake of the war nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.