डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलॅंडचे स्वप्न साकार होणार; रिपब्लिकन कायदेकर्त्यांनी दाखवला हिरवा झेंडा(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेचे होणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चा विषय बनत आहेत. त्यांच्या ग्रीनलॅंड, कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याच्या प्रस्तावावरुन जागतिक स्तरावर वाद निर्माण झाला होता. एकीकडे अमेरिकेच्या जंगलात भीषण आग पसरलेली असताना ट्रम्प यांचा हा ग्रीनलॅंड खरेदी करण्याचा प्रस्ताव विवादित होता. यावर ग्रीनलॅंडच्या पंतप्रधानांनी देखील निषेध केला होता. मात्र, आता ट्रम्प यांचे स्वप्न साकार होणार असल्याचा दावा त्याच्या पक्षाच्या कायदेकर्त्यांनी दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वप्न साकार होणार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निष्ठावंत रिप्लब्लिकन कायदेकर्त्यांनी ग्रीनलॅंडचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मागर्वार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावाची खिल्ली उडवण्यात आला होती. मात्र, आता रिप्लब्लिकन कायदेकर्त्यांनी याला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलँड खरेदी करण्याचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते. रिपब्लिकन पक्षाच्या दहा खासदारांनी यासाठी प्रस्ताव सादर केला असून ग्रीनलँड खरेदीसाठी डेनमार्कसोबत चर्चेला मंजुरी दिली आहे.
ग्रीनलँड खरेदीसाठी कायद्याचा प्रस्ताव
मीडिया रिपोर्टनुसार, 13 जानेवारी रोजी रिपब्लिकन खासदारांनी “मेक ग्रीनलँड ग्रेट अगेन ऍक्ट” या नावाने एक विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार, कोमतेही अंतिम करार झाल्यास ट्रम्प यांना तो पाच दिवसांत संसदेच्या समित्यांसमोर सादर करावा लागेल. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार, आर्थिक निर्णयांसाठी काँग्रेसची मंजुरी आवश्यक असते. यामुळे ग्रीनलँड खरेदी करण्यासाठी आधी काँग्रेसकडून निधी मंजूर करण्यात येईल. यासाठी ट्रम्प यांना प्रतिनिधिगृह व सिनेट या दोन्ही ठिकाणी मंजुरी मिळवावी लागणार आहे.
ग्रीनलँड खरेदीसाठी ट्रम्प यांचा युक्तिवाद
ग्रीनलँड खरेदीमुळे अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असल्याचा ट्रम्प समर्थकांनी दावा केला आहे. यामुळे नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येईल आणि अमेरिकेच्या जागतदिक सामर्थ्यामध्ये वाढ होईल असे कायदेकर्त्यांनी म्हटले आहे. डेनमार्कच्या काही खासदारांनी अमेरिकेसोबत चर्चेची मागणी केली होती, याकडेही ट्रम्प समर्थक लक्ष वेधत आहेत. काही खासदारांचा याला तीव्र विरोध आहे. त्यांच्यामते हा प्रस्ताव कामकाजावरून लक्ष विचलित करणारा आहे.
अमेरिकेच्या नागरिकांच्या समस्या बाजूला ठेवून अशा निर्णयांवर वेळ वाया घालवला जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ग्रीनलँड खरेदीमुळे जागतिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावर पुढील काळात कायदेशीर व राजकीय चर्चा होईल. डोनाल्ड ट्रंप यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.