Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

EU Social Media Ban : युरोपियन युनियनने मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. १३ वर्षांखालील मुलांसाठी स्वतंत्र सोशल मीडिया प्रवेशावर बंदी आणि १३ ते १५ वयोगटासाठी पालकांच्या नियंत्रणाखाली मर्यादित प्रवेशाची योजना आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप अंतिम कायदा झालेला नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 16, 2026 | 05:31 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • १३ वर्षा खालील मुलांवर कडक निर्बंध
  • १३ ते १५ वयोगटासाठी पालकांची परवानगी
  • टिकटॉक इंटस्टाग्रामसह सह प्लॅटफॉर्मवर परिणाम
EU Social Media Ban :  युरोपियन युनियनमध्ये लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध आणण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी ‘EU Kids Act’ अंतर्गत मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी नव्या नियमांची घोषणा केली.

प्रस्तावानुसार १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र प्रवेश मिळणार नाही, तर १३ ते १५ वयोगटातील मुलांसाठी पालकांच्या नियंत्रणाखाली मर्यादित प्रवेशाची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, हे नियम अद्याप कायदा झालेले नाहीत; पुढील प्रक्रियेनंतर त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

१३ वर्षा खालील मुलांवर कडक निर्बंध

या प्रस्तावाचा मुख्य उद्देश मुलांना सोशल मीडियावरील हानिकारक कंटेंट, व्यसनाधीन करणाऱ्या फीचर्स आणि अनोळखी व्यक्तींशी होणाऱ्या संपर्कापासून सुरक्षित ठेवणे हा आहे. १३ वर्षांखालील मुलांसाठी स्वतंत्र सोशल मीडिया अकाउंटवर निर्बंध आणण्याची योजना आहे.

त्याऐवजी वयानुसार सुरक्षित आणि मुलांसाठी तयार केलेल्या डिजिटल सेवांचा वापर करण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. युरोपियन कमिशनच्या प्रस्तावात सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांचे वय पडताळण्याची जबाबदारी देण्याचाही विचार आहे.

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

१३ ते १५ वयोगटासाठी पालकांची परवानगी

१३ ते १५ वर्षांच्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्ण स्वातंत्र्य न देता मर्यादित सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. या वयोगटातील अकाउंट्सवर पालकांची परवानगी आणि देखरेख असू शकते. स्क्रीन टाइमवर मर्यादा तसेच काही फीचर्सवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे.

१५ वर्षांवरील किशोरवयीन मुलांना सोशल मीडिया वापरण्याची अधिक मुभा असेल; मात्र प्लॅटफॉर्मना त्यांच्या सुरक्षेसाठी ‘safe by design’ पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

टिकटॉक इंटस्टाग्रामसह सह प्लॅटफॉर्मवर परिणाम

या प्रस्तावाचा परिणाम TikTok, Instagram आणि YouTubeसारख्या मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर होऊ शकतो. मुलांना सतत स्क्रोल करत ठेवणाऱ्या डिझाइन पद्धती, कृत्रिम नोटिफिकेशन्स आणि वापरकर्त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही पद्धतींवरही निर्बंध आणण्याचा विचार आहे.

मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत युरोपमध्ये आधीपासूनच चर्चा सुरू आहे. आता संपूर्ण EUमध्ये समान नियम लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र प्रस्तावाला युरोपियन संसद आणि सदस्य देशांची पुढील मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियम कधी आणि कोणत्या स्वरूपात लागू होतील, हे पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे .

Web Title: Eu social media ban social media ban for children under 13 parental supervision until age 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Marathi News
  • Social Media
  • social media ban
  • Top Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार
1

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
2

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश
3

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL
4

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.