European Union supports Arab 'realistic' Arab plan for Gaza
गाझा पट्टीत हमास-इस्त्रायल युद्धामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. सध्या गाझाच्या पुनर्बांधणासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आईहे. यासाठी अरब देशांनी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. 04 मार्च 2025 रोजी काहिरमध्ये अरब लीगची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाझाच्या पुनर्बांदधीणी योजनेवर सहमती झाली. या योजनेसाठी अरब देशांना फ्रान्स, इटली आणि ब्रिटन या युरोपियन देशांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
ट्रम्प आणि नेतन्याहूंच्या योजनेला विरोध
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाच्या पुनर्निर्माणासाठी एक वेगळी योजना मांडली होती. ट्रम्प यांच्या योनेचत गाझाला मिडल ईस्टचे रिवेरा बनवण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावात त्यांनी स्थानिक पॅलेस्टिनींना गाझातून इजिप्त, जॉर्डन आणि इतर देशांमध्ये विस्थापित करण्याची कल्पना होती. मात्र, ट्रम्प यांच्या या योजनेला अरब देश आणि युरोपियन देशांनी तीव्र विरोध केला. पॅलेस्टिनींना विस्थापित न करता पुनर्बांधणी करण्याचा अरब आणि युरोपिय देशांची योजना होती.
इजिप्तच्या योजनेचे महत्त्व
इजिप्तने आखलेल्या या नव्या योजनेच गाझातील रहिवाशांना विस्थापित न करता, त्याच ठिकाणी गाझाच्या पुनर्बांधणीवर भर देण्यात आला आहे. या योजनेसाठी 53 अब्ज डॉलरची गरज असल्याचे इजिप्तने आपल्या प्रस्तावात सांगतिल. अरब देशांसोबतच युरोपियन देशांनीही आर्थिक पाठिंबा देण्यास तयारी दर्शवली.
योजनेतील महत्त्वाचे मुद्दे
तीन टप्प्यात पूर्ण होणार योजना
गाझाच्या पुनर्बांधणीची योजना तीन टप्प्यात आखण्यात आली आहे.