
FBI Director Kash Patel Faces critisized over SWAT protection for girlfriend
काश पटेल यांचे FBIचे संचालक पद धोक्यात? चार्ली कर्कच्या हत्येप्रकरणी होत आहे जोरदार टीका
सध्या ते गर्लफ्रेंड ॲलेक्सिस विल्किन्सला हाय-प्रोफाइल SWAT सुरक्षा पुरवल्याच्या प्रकरणावरुन जोरदार चर्चेत आहेत. या प्रकराणाची भारतीय-अमेरिकेन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने चौकशी सुरु केली आहे. यापूर्वी देखील पटेल यांच्या अनेक निर्णयांवर त्यांच्यावर टीका केली जात होती. यापूर्वी त्यांच्यावर ट्रम्पचे जवळचे मित्र चार्ली कर्क यांच्या हत्यप्रकरणी एका निर्णयाबाबत देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल रायफल असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनादरम्यान ॲलेक्सिस विल्किन्सला दोन स्वाट टीम गार्ड पुरवण्यात आले होते. यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर टीका केली आहे.
SWAT टीम ही अमेरिकेच्या स्टेट्समधील एक उच्च प्रशिक्षित युनिट आहे. या युनिटची जबाबदारी देशातील हाय-प्रोफाइल लोकांची सुरक्षा करणे आहे. तसेच ही युनिट दहशतवाद्यांच्या जाळ्यातून कैद्यांना सोडवण्यासाठी देखील नामांकित आहे.
काश पटेल यांच्यावर स्वाट युनिटचा गैरवापर केल्याच्या आरोपाशिवाय, सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. या निधीचा वापर त्यांनी त्यांचे आणि त्यांच्या गर्लफ्रेंडच्या सुरक्षेसाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर वैयक्तिक ट्रीप्ससाठी सरकारी विमानांचा वापक केल्याचाही आरोप आहे.
काश पटेल यांच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या जवळचे सहकारी आणि मित्र चार्ली कर्क (Charlie Kirk) यांच्या प्रकरणावरुन देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काश पटेल यांनी कर्कच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली होती. पण नंतर दोन्ही व्यक्ती निर्दोष असल्याचे आढळून आले. यामुळे सध्या काश पटेल यांच्या कामकाजावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. शिवाय एपस्टिन प्रकरणावरुन देखील काश पटेल चौकशीत आहेत.
Kash Patel : कोण आहेत काश पटेल? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI चे संचालक बनवलं