
Sheikh Hasina Extradiction
दरम्यान यामुळे मोहम्मद युनूस (Muhammd Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशने ब्रिटनच्या दोन वकिलांना नियुक्त केले आहेत. हे दोन्ही वकिल प्रत्यार्पणाच्या प्रकरणांमध्ये जागतिक स्तरावर नामांकित वकिल आहेत.टोबी कॅडमन आणि अनास्ताया मेदवेदस्काया अशी यांची नावे आहेत. रविवारी (२३ नोव्हेंबर) बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहोचले आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये हसीनाच्या घरावर विद्यार्थी आंदोलकांनी हल्ला केला होता. यावेळी हसीना यांनी आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून त्यांच्याविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने खटला चालवला आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. हसीनावर जुलै २०२४ ते ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर अमानवीय कारवाईचे आदेश देण्याच्या आणि मानव अधिकाराचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सराकरने भारताला हसीनाच्या प्रत्यार्पणासाठी तीन वेळा अधिकृत पत्र पाठवले आहेत. पण भारताकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतरही बांगलादेशात हसीनाच्या फाशीची मागणी जोर धरत आहे. तसेच सरकारने देखील त्यांच्या प्रत्यार्पणासाठी आशावादी आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात बांगलादेश सरकार जाणार
भारताकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने युनूस सरकारने ब्रिटनच्या दोन वकिलांना नियुक्त केले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनूस सरकारसध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात हसीनाच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा विचार करत आहे.यासाठी बांगलादेशने ब्रिटनच्या टोबी कॅडमन आणि अनास्तास्या या विकलांनी नियुक्त केले आहे. युनूस सरकार हसीनाला कोणत्याही किमतीत देशात परत आणण्याचा प्रयत्न करत आहे.
Ans: बांगलादेशने हसीनाच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनच्या दोन नामांकित विकलांना नियुक्त केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनूस सरकार आंतरराष्ट्रीय न्यायालयात हसीनाच्या प्रत्यार्पणाचा विचार करत आहे.
Ans: बांगलादेशने हसीनाच्या प्रत्यार्पणासाठी भारताला ३ वेळा अधिकृत पत्र लिहिले आहे.
Ans: बांगलादेशच्या हसीनाच्या प्रत्यापर्पणाच्या अधिकृत मागणीपत्रावर भारताने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.