कोण आहेत काश पटेल? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI चे संचालक बनवलं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुन्हा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर विश्वास दाखवला आहे. शनिवारी त्यांनी काश पटेल यांची FBI चे नवीन संचालक म्हणून नियुक्त केली. पटेल ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. FBI अमेरिकेतील वाढती गुन्हेगारी, स्थलांतरित गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट करेल आणि सीमेपलीकडून होणारी मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करीही थांबवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी विश्वास दाखवत इतकी मोठी जबाबदारी टाकलेले काश पटेल नेमके आहेत तरी कोण, जाणून घेऊया…
काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये गुजराती अनिवासी कुटुंबात झाला होता. अमेरिकन मीडिया नुसार, काश पटेल ट्रम्प यांचे निकटपर्तीय मानले जातात. ट्रम्प यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती होती. पटेल यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवर “गव्हर्नमेंट गँगस्टर्स: द डीप स्टेट, द ट्रुथ अँड द बैटल फॉर अवर डेमोक्रसी” नावाचे एक पुस्तक लिहिलं आहे, ज्याची मीडियामध्ये मोठी चर्चा झाली होती.
काश पटेल यांच्या कुटुंबाने 1980 मध्ये पूर्व अफ्रिकेतून न्यूयॉर्कच्या क्वीन्समध्ये स्थलांतर केलं होतं. त्यांचे वडील गुजरातच्या बडोदामधील रहिवासी होते, कामानिमित्ताने निमित्ताने युगांडामध्ये स्थायिक झाले होते. पटेल एलएलबी आहेत आणि यापूर्वी त्यांनी फ्लोरिडामध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळात काश पटेल त्यांच्यासोबत होते. त्यावेळी पटेल हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते ट्रम्पचे कार्यवाहक संरक्षण सचिव देखील राहिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प सध्याचे एफबीआय संचालक क्रिस्टोफर रे यांच्या कामावर खूश नाहीत. 2017 मध्ये ट्रम्प यांनी स्वत: त्यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली. मात्र गोपनीय कागदपत्रांसंदर्भातील तपासात ट्रम्प यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काश पटेल यांनी एफबीआयमध्ये बदल करणार असल्याचं म्हटलं आहे. ज्यामध्ये FBI च्या गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या पद्धतीत बदल करणे आणि मुख्यालयाची पुनर्बांधणी करण्याचं त्यांचे ध्येय आहे. एफबीआय आणि न्याय विभागाच्या जवळच्या सहकाऱ्यांना वरीष्ठ पातळीवर ठेवण्यासाठी ते प्रयत्नशिल असल्याचंही समजतं.
क्रिस्टोफर रे यांच्या जागी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2017 मध्ये ट्रम्प यांनी त्यांयी नियुक्ती केली होती परंतु ते अध्यक्ष आणि त्यांच्या सरकाऱ्यांच्या पसंतीस उतरले. जरी हे पद 10 वर्षांच्या कालावधीसाठी असलं तरी, ट्रम्प आणि एफबीआय यांच्यावर दीर्घकाळ चाललेली सार्वजनिक टीका, कोर्टात चाललेले खटले यामुळे रे यांना काढून टाकणे अनपेक्षित असं काही नव्हतं. यात दस्तऐवजांसाठी त्याच्या फ्लोरिडा मालमत्तेचा शोध आणि त्याच्यावर आरोप लावण्यात आलेल्या दोन तपासांचाही समावेश असल्याचंही सांगितलं जात आहे.






