रुग्णवाहिकेतच ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; गडचिरोलीहून रुग्ण घेऊन जात होती नागपूरला
लंडन : ब्रिटनच्या पश्चिम भागातील एका पॉवर सबस्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनमधील हजारो घरे अंधारात गेली असून, हिथ्रो विमानतळाचे कामकाजही ठप्प झाले आहे. ही आग एवढी भयानक होती की, 150 हून अधिक लोकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. लंडन अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र वीजपुरवठा कधी पूर्ववत होईल याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.
ही घटना गुरुवारी रात्री 11:23 वाजता घडली. पश्चिम लंडनमधील पॉवर हाऊसच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली, आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीमुळे 16,300 हून अधिक घरे आणि व्यवसाय प्रभावित झाले असून, संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतीय ‘BOFORS’ रणांगण हादरवणार; स्वदेशी ATAGS तोफेच्या रूपात लष्कराला मिळाली नवी ताकद
या घटनेचा सर्वाधिक फटका लंडनच्या हिथ्रो विमानतळाला बसला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने विमानतळावर कामकाज ठप्प झाले असून, सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रशासनाने जाहीर केले आहे की, हिथ्रो विमानतळ शुक्रवारी दिवसभर बंद राहील. त्यामुळे हजारो प्रवासी अडकले असून, अनेकांना त्यांच्या नियोजित प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे.
विमानतळ प्रशासनाने एका निवेदनात स्पष्ट केले की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय विमानतळाचे कामकाज सुरू करता येणार नाही. प्रवाशांना विमानतळावर येऊ नका असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
लंडन अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यासाठी 10 अग्निशमन गाड्या आणि 70 हून अधिक फायर फायटर्स तैनात करण्यात आले आहेत. सहाय्यक आयुक्त पॅट गौलबर्न यांनी सांगितले की, आगीमुळे परिसरातील अनेक घरांचा आणि व्यावसायिक आस्थापनांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. नागरिकांना शक्यतो बाधित भागात जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर या आगीचे थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यात आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि आकाशात पसरलेला दाट काळा धूर स्पष्ट दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
This level of violence is insane and deeply wrong.
Tesla just makes electric cars and has done nothing to deserve these evil attacks. https://t.co/Fh1rcfsJPh
— Elon Musk (@elonmusk) March 18, 2025
credit : social media
‘स्कॉटिश अँड सदर्न इलेक्ट्रिसिटी नेटवर्क’ (SSEN) या वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीने ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली की, लंडनमधील हजारो घरे आणि व्यवसाय या आगीमुळे अंधारात गेले आहेत. कंपनीने असेही स्पष्ट केले की, संबंधित तांत्रिक यंत्रणेसोबत समन्वय साधला जात आहे आणि शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अधिकृत तपास सुरू असून, लवकरच याबाबत सविस्तर माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आगीमुळे लंडनमधील अनेक कुटुंबे आणि व्यावसायिक मोठ्या अडचणीत आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने घरोघरी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवांवरही परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बाधित भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘NATO’ अमेरिकेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, थांबवणार ‘ही’ मोठी डील, जाणून घ्या का?
लंडनमधील या भीषण आगीमुळे वीजपुरवठा, वाहतूक आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. हिथ्रो विमानतळ बंद राहिल्याने हजारो प्रवासी अडचणीत आले असून, संपूर्ण यंत्रणा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहे. अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असले तरी, परिस्थिती पूर्ववत होण्यास काही दिवस लागू शकतात. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.