Fire breaks out at building near Seoul Plaza in South Korea
South Korea News in Marathi : सियोल : दक्षिण कोरियाची (South Korea) मध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. राजधानी सियोलमध्ये एका बिल्डिंगला आग लागली आहे आहे. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. या आगीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सियोलमधील एका सेंटर ब्लिडिंगमध्ये ही आग लागली. आग इतकी प्रचंड होती की हवेत आगीच्या झळा भडकल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आहे. सध्या जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने दुर्घटनेत कोणाचाही जीव गेला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, आग इमारतीच्या तिसऱ्या बांधकाम सुरु असलेल्या मजल्यावर लागली. सध्या आगी लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग विझवण्याचे काम सुरु आहे. आग कशी लागली याचा तपसाही सुरु करण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसाप, इमारतीत तिसऱ्या मजल्यावर दहा बांधकाम कामगार होते.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढले आहे. यासाठी क्रेन आणि शिड्यांचा वापर करण्यात आला. तसेच सियोलच्या महानगपालिका आणि आपत्कालीन सेवांनी देखील तातडीने इमारतीच्या आसपासाचा परिसर रिकामा करण्यास लोकांना सांगितले. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन गलाला यश आले. पण या वेळेत परिसराती वाहतूक सेवा ठप्प झाली होती.
यापूर्वी देखील दक्षिण कोरियामध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. दोन गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सियोलमध्ये नॅशनल डेटा इन्फ्रास्ट्रक्चर सेंटरमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे सर्व सरकारी कामकाज ठप्प झाले आहेत. तसेच मोबाइल आयडेंटिफिकेशन सिस्टमसह अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्स बंद पडले होते. या घटनेला एक महिना पूर्ण झालेला नसताना पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
सध्या नुकत्याच घडलेल्या घटनेचा तपास सुरु आहे. आग नेमकी कशी लागली याचा शोध घेतला जात असून इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे किंवा बांधकामातील उपकरणांच्या बिघाडामुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. सरकारने सखोल चौकशीचे आदेश दिले आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. दक्षिण कोरियात कुठे घडली आग लागल्याची घटना?
दक्षिण कोरियात राजधानी सियोलमध्ये सेंटर प्लाजाजवळी इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे.
प्रश्न २. दक्षिण कोरियातील आगीच्या दुर्घटनेत किती जीवीतहानी झाली?
दक्षिण कोरियात सियोलमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेते कोणाचाही मृत्यू झालेला नाही, तीन जण गंभीर जखमी झाले आहे. तर १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे.