Los Angeles fire: कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीची तीव्रता सॅटेलाइट इमेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. दरम्यान, लॉस एंजेलिसच्या पॅसिफिक पॅलिसेड्स भागात राहणारे रिअल इस्टेट व्यावसायिक कीथ वासरमन यांनी त्यांचे घर वाचवण्यासाठी ट्विटरवर एक खासगी मागणी केली. त्यांच्या या मागणीला आता स्वार्थी मानसिकतेचे उदाहरण म्हटले जात आहे.
धूराने जळत आहे लॉस एंजेलिस, सर्वत्र आगीचा तांडव... तरीही थांबत नाहीयेत श्रीमंतांच्या डिमांड
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे असलेल्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसर उद्ध्वस्त करून सोडले आहे. सर्वस्व गमावून हजारो लोक सुरक्षित ठिकाणांच्या शोधात असताना एका श्रीमंत व्यक्तीच्या प्रश्नावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे
खरं तर, लॉस एंजेलिसच्या पॅसिफिक पॅलिसेड्स भागात राहणारे रिअल इस्टेट व्यावसायिक कीथ वासरमन यांनी त्यांचे घर वाचवण्यासाठी ट्विटरवर खाजगी अग्निशामक दलाची मागणी केली.
यात त्यांनी लिहिले की, खाजगी अग्निशमन दलाचे कोणाचे संपर्क आहेत का? आमचे घर वाचवण्यासाठी आम्हाला त्वरित मदतीची आवश्यकता आहे. कोणतीही किंमत मोजायला तयार आहे
ही पोस्ट केल्यांनतर ती काही वेळातच सोशल मीडियावर लोकांच्या रोषाचे लक्ष्य बनले. वासरमनच्या आवाहनाला लोकांनी श्रीमंतांच्या स्वार्थी मानसिकतेचे उदाहरण म्हटले
ही आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडी नैसर्गिक आपत्ती ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेपी मॉर्गन येथील विश्लेषकाच्या मते, एकूण तोटा $50 अब्जपर्यंत पोहोचू शकतो, ज्यापैकी $20 अब्ज विमा कंपन्यांद्वारे कव्हर केले जातील