First glimpse of China's sixth-generation J-36 fighter and J-50 fighter jets seen, is it a challenge for the US
बिजिंग: सध्या चीन आणि अमेरिकेत तीव्र व्यापार युद्ध सुरु आहे. या व्यापर युद्धाचा परिणाम जागतिक स्तरावर होत आहे. चीन अमेरिकाला सतत आव्हान देत असते. व्यापर युद्ध असो वा शस्त्र युद्ध चीनने नेहमीच अमेरिकेला आव्हान दिले आहे. अमेरिकेच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देण्यास चीन तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. दरम्यान पुन्हा एकदा अमेरिकेची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण अलीकडेच चीनने आपल्या नव्या पिढीच्या लढाऊ विमानांची ताकदीचे प्रदर्शन केले आहे. यामुळे जागतिक धोरणात्मक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने आपल्या J-36 आणि J-50 या दोन अत्याधुनिक फाइटर जेट्सची टेस्टिंग जोरात सुरू केली आहे. हे लढाऊ विमाने सहाव्या पिढीतील लढाऊ विमाने मानली जात आहे. यामुळे अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
New images of China’s 6th-generation fighter jet, developed by the Shenyang Aircraft Corporation (SAC).
The J-XDS (aka J-50). pic.twitter.com/o4YCMMHTqu
— Clash Report (@clashreport) April 17, 2025
चीनच्या या कृतीतून दिसून येते की, अमेरिका संरक्षण क्षेत्रात ड्रॅगन थेट आव्हान देत आहे. सध्या अमेरिका F-47 च्या सहाव्या पिढीच्या विमानवर काम करत आहे. परंतु चीनने देखील त्यांच्या प्रोटोटाइप्सची प्रत्यक्ष झलक दाखवली आहे. चीनने अमेरिकाला अप्रत्यक्ष संदेश दिला आहे की, ड्रॅगन कोणत्याही लढाईसाठी सज्ज आहे. सध्या व्यापारी, तांत्रिक आणि लष्करी क्षेत्रात अमेरिका-चीन दरम्यानचा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.